|
|
|
 |
 |
 |
|
त्वरीत सल्ल्यासाठी खालील फॉर्म भरा.
|
|
|
|
|
|
 |
|
प्रत्येक अडचणींपासून वाचण्यासाठी युक्त्या आणि सल्ले
|
|
|
|
|
|
 |
|
|
 |
|
वास्तुशास्त्राची मूळ कल्पना ही सूर्यमंडलावरुन
निर्माण झाली आहे. ऊर्जा, ऊर्जेचे संस्करण , दिशांनुरुप
ग्रहादींचा प्रभाव या सार्यांच्याच मुळाशी सूर्यमंडल
आहे व त्यातही सूर्याचा प्रभाव हा अत्यंत महत्वाचा
घटक आहे. किंबहुना पृथ्वीसहित आपले सर्व ग्रह व
उपग्रह सूर्यापासून निर्माण झालेले आहेत. हे सर्व
सूर्याभोवती फिरत असतात व सूर्यामुळेच अस्तित्वात
आहेत. पृथ्वीवर असणारी जीवसृष्टी ही सूर्यकिरणांच्या
शक्तीवरच जीवित आहे.
निसर्गाची अनेक रुपे वैदिक काळात पूजली , गायली गेली.
देव , मूर्तिपूजा यांपेक्षाही सूर्य , अग्नी, वरुण
, इंद्र , मरुत् , उषस् अशा निसर्गाच्या रुपांनाच
देवत्व बहाल केल्याचे दिसून येते.
ऋग्वेदादि ऋचांमध्ये सूर्यदेवता, सविता , आदित्य
, मित्र आदी तेजोमय , प्रकाशमय रुपांची अतिशय सौंदर्यपूर्ण
वर्णने आढळतात. या देवतांविषयीची श्रध्दा तसेच
कृतज्ञतेचा भाव ठायी ठायी आढळतो. अंधकाराला छेद
देत अवतरणारी उषा ( पहाट ) ,आपल्या तेजस्वी सुवर्णकिरणरुपी
अश्वरथावर स्वार सविता, नभोमंडलात मार्गक्रमण
करणारे प्रकाशमय आदित्यस्वरुप , तेजाने तळपणारी
सूर्यदेवता यांचा वेदकालीन मानवी जीवनावरील प्रभाव
ऋचांमध्ये काव्यमयरीत्या वर्णन केला आहे. त्यातील
पुढील काही ऋचांचा काव्यार्थ -
१. अंधकाराचा नाश करणार्या सुवर्णरथात विराजमान
मर्त्य व अमर्त्य (देव) यांना स्थिर करणार्या स्वर्ग
आणि पृथ्वीला पावन करणार्या सुवर्ण-अक्ष सवितेने
आपल्या पूजकांवर कृपादृष्टीचा वर्षाव केला आहे.
२. सुवर्णरथात विराजमान , सुवर्णहस्त , सुवर्णाक्षयुक्त
सवितेने अंधकाराला छेदून रोगाचे निर्दालन केले
आहे आणि आरोग्याचे दालन खुले केले आहे.
३. हे मित्रा (सूर्या) , जो तुझ्या कृपेने वरला त्याचे
कोणत्याही प्रकारे हनन झालेले नाही आणि अवकृपा
तर त्याच्यावर जवळून व दुरुनही झालीच नाही.
४. हे मित्रा, अखिल विश्व तुझ्या कृपेपुढे नतमस्तक
झाले आहे. तू सर्व विश्वाचा आधार आहेस. तुझे माहात्म
स्वर्गाहून श्रेष्ठ तर वैभव पृथ्वीपेक्षा सरस आहे.
खरोखरच उदयाचळी या मित्राचे आगमन होताच अखिल चराचर
सृष्टिच्या दिवसाची सुरुवात होते. याच्याच दिव्य
तेजाने जीवसृष्टी न्हाऊन निघते. विश्वातील अणुरेणू
पुलकित होतात. हजारो वर्षांपासून हा नित्यक्रम
चालू आहे. वसुंधरेच्या घरचे हे ऊर्जास्त्रोत तिमिराचे
हरण करुन अभय प्रदान करतात.
विज्ञानानेदेखील सूर्याच्या या उपकारक रुपाचे
वैज्ञानिक कोडे उलगडण्याकरिता प्रयन्तांची शिकस्त
केली आहे. सूर्याची किरणे Prism मधून गेल्यास या
सूर्यकिरणांचे विकरण ( पृथक्करण ) होऊन सप्तरंगी
किरणांच्या छटा ( तांबडा , नारंगी , पिवळा , हिरवा ,
निळा , पारवा , जांभळा ) दृष्टीस पडतात. ऋचांमध्ये
वर्णन केलेले सुवर्णरथाचे सात अश्व या सप्तरंगछ्टाच
असाव्यात. वेदिक काळातही हे सप्तरंग ज्ञात होते.
सूर्यापासून अनेक प्रकारची किरणे मिळतात हे तर
पाहिलेच. ही सर्वच किरणे वेगवेगळ्या प्रकारे उपयुक्त
ठरतात. जीवसृष्टीची निर्मिती या किरणांमुळेच झाली.
सृष्टीनिर्मितीप्रमाणेच सृष्टीचा विकास ज्यास
उत्क्रांती म्हणतात व सृष्टीचे संरक्षणही या किरणांच्या
ऊर्जेमुळेच शक्य झाले आहे. आता तर सौर किरणांचा वापर
अनेक प्रकारे उर्जा निर्माण करुन अशक्य वाटणारी
असंख्य कामे करण्याकरिता होतो. सौर उर्जेचे रुपांतर
विद्युत उर्जेत करुन सध्या तर अनेकविध सोलर विद्युत
उपकरणे सर्रास वापरात येत आहेत. विजेचा तुटवडा असताना
अशा प्रकारे सौर ऊर्जेचा वापर मानवावर उपकारच आहे.
सध्याच Loadsheding आणि महागडया वीजदराच्या काळात
सामान्य माणूस या सौरऊर्जेने सुखावला आहे. म्हणजेच
आधुनिक विज्ञानानेदेखील सूर्याचे हे खरे ’ मित्ररुप’
मान्य केले आहे.
विज्ञानाने सौर उर्जेद्वारे अनेक भौतिक सुखे पदरात
पाडलीच परंतु भौतिक सुखांबरोबर शारीरिक , मानसिक
व आध्यात्मिक विकासातील सौर उर्जेची खरी किमया
आहे. सूर्याच्या सप्तरंगी किरणांमधील अल्ट्राव्हायेट
तसेच इन्फ्रारेड किरणांचा उपयोग अनेक प्रकारे रोगोपचाराकरिता
होतो. सकाळच्या कोवळ्या किरणांमुळ 'Vitamin – D' चा पुरवठा होतो; हाडांना बळकटी येते.
सूर्याच्या किरणांमध्ये Typhoid, Pneumonia, राजयक्ष्मा यांसारख्या रोगांना नष्ट करण्याची
दिव्य शक्ती आहे. काही जातीचे विषाणू जे शुष्क वातावरणातही
मरत नाहीत ते सूर्यकिरणांद्वारे काही तासाभरातच
मृत्युमुखी पडतात, Pneumonia, गोवर आदींचे विषाणू
पाण्यामध्ये उकळूनही मरण पावत नाहीत जे सूर्याच्या
प्रभातकालीन किरणांनी नष्ट होतात.
पाश्चात्य देशातील "Chromopathy "ही सूर्यकिरण
चिकित्साच आहे. त्यांना सूर्यप्रकाश फार कमी मिळतो
म्हणून त्यांची निराशा होते. आपणाकडे सूर्यप्रकाश
भरपूर असतानाही आपण या अल्पमोली बहुगुणी पध्दतीकडे
लक्ष देत नाही ही दुर्दैवाची गोष्ट आहे. अविकसित
देशांच्या दृष्टीने की जिथे सूर्यप्रकाश भरपूर
आहे, सूर्यकिरणांच्या औषधी उपयोगाकडे फारच कमी
लक्ष दिलेले आढळते. पाणी, तेल , प्रकाश यांचा ’ माध्यम’
म्हणून वापर करुन सुर्यकिरणातील विविध रंगांचा
वापर औषधिचिकित्सेमध्ये केला जातो. प्रत्यक्ष सूर्यप्रकाश
अगर उन्हात आरसा ठेवून कवडसा वापरून रंगीत काचेतून
शरीराच्या हव्या असलेल्या भागावर १०-१५ किरण पाडावेत.
सूर्याला अर्ध्य देण्यामागे उपासना तसेच वैज्ञानिक
आधारही आहे. अर्ध्य देताना पाण्याला ओलांडून येणारे
सूर्यकिरणांचे इंद्रधनुष्यीय प्रकाशसमूह सप्तकिरणांद्वारे
शरीरातील विविध भागांना प्रभावित करतात. आज्ञाचक्राचे
विकसन करतात. नेत्रबल वाढवतात.
सूर्य हा स्वयंप्रकाशीत तारा असून, चंद्र हा परप्रकाशित
ग्रह आहे. सूर्याची सरळ ऊर्जा चंद्राद्वारे परावर्तित
होऊन पृथ्वीवर बरसत असते. चंद्र हा रसांची निर्मीती
करणारा ग्रह आहे. चंद्राची शीतल किरणे मनाची शक्तिकंपने
सतत प्रस्फुटित करते, म्हणुनच तो मनाचा कारक आहे.
सर्व इंद्रियांचे प्रवर्तक , सुखदु:ख संवेदनाग्राहक
मनाचा व्यापार चांद्रबलावर अवलंबून असतो. सूर्याच्या
ऊर्जेवरच हे चांद्रबल अवलंबून असते.
सूर्याचे माहात्म्य जगमान्य आहेच; परंतु त्यास
देवत्व बहाल करणे, सूर्याची उपासना करणे हा अध्यात्मातील
फार महत्वाचा भागही आहे. पृथ्वी , जल , तेज , वायु आणि
आकाश ही महाभूते चराचरसृष्टीत अणुरेणूत व्यापलेली
आहेत. यातील प्रत्येक तत्वाची एक देवता असून पंचायतनपूजनाद्वारे
या तत्वांचे पूजन होते.
आकाशतत्वाची देवता विष्णू , अग्नितत्वाची शक्तीदेवता,
पृथ्वीतत्वाची शिव, जलतत्वाची गणेशदेवता , तर वायुतत्वाची
देवता सूर्य आहे.
सूर्य हा वायुतत्वाचा अधिपती असल्याने त्याचा संबध
प्राणाशी आहे. म्हणूनच प्राणायाम , सूर्यनमस्कार
यांच्याद्वारे पूजनाचे विधान आहे. या पूजनाने प्राणाचे
प्रीणन झाल्याने शारीरिक , मानसिक , बौध्दिक बलविकसन
होते. सर्व रोगांचे उच्चाटन होते म्हणूनच स्मृतिग्रंथात
आरोग्याकरिता सूर्याची उपासना करण्यास सांगितली
आहे.
सूर्यस्तुतीपर अत्यंत प्रभावी ’सौरयुक्त’ सूर्यदेवतेच्या
१०८ नामांचे ’सूर्य अष्टोत्तरशतनामस्तोत्र ’अगस्तीमुनींनी
प्रभुरामचंद्रांना कथलेले ’आदित्यह्र्द्यस्तोत्र’
यांच्या पठणाने , जप , अभिषेक याने उत्कृष्ट आरोग्यप्राप्ती
होते. मित्र - रवी - सूर्य - भानु प्रभृति सूर्यनामे
गुंफून सूर्यनमस्कार घातल्यास व याच मंत्रांनी
सूर्यास अर्घ्य दिल्यासही उत्तम आरोग्य लाभते.
ज्या दिशेस सूर्यनारायणाचे अधिराज्य आहे अशा पूर्व
दिशेस आरोग्याची, प्रगतीची , उत्साहाची, चैतन्याची
दिशा का म्हणतात, हे वेगळे सांगणे नकोच. पूर्वदिशेचेच
एक नाव ’प्राची’ आहे. ’प्रा’ म्हणजे प्राणशक्ती
आणि ’ची’ धातूची अर्थ पसरवणे असा आहे. प्राणशक्ती
पसरवणारी दिशा ती प्राची असे या दिशेचे नाव किती
बरे सार्थ आहे. पूर्वदिशेची अधिकाधिक चांगली फळे
मिळणे म्हणजे साक्षात् सूर्यनारायणाचाच वरदहस्त
लाभण्यासारखे आहे. पूर्वदिशेकडून मिळणारी ही ऊर्जा
प्राणिक ऊर्जा म्हणून वास्तुशास्त्रात संबोधितात.
पूर्वेच्या प्राणिक ऊर्जेप्रमाणेच उत्तरेकडून
दक्षिणेकडे शुभ जैविक ऊर्जा प्रवाहित होते. प्राणिक
व जैविक ऊर्जांमुळे अनुक्रमे पूर्व व उत्तर या शुभऊर्जायुक्त
दिशा ठरतात. ईशान्य दिशा ही पूर्व व उत्तर या दिशांची
संगमदिशा असल्याने तेथे अत्याधिक शुभ ऊर्जेचे स्थान
आहे. म्हणूनच पूर्व - ईशान्य - उत्तर हा शुभ ऊर्जायुक्त
प्रभाग आहे.
याविपरीत पश्चिम व दक्षिण या दिशा अनुक्रमे प्राणिक
आणि जैविक ऊर्जेच्या अस्तदिशा आहेत. नैऋत्य दिशा
ही दक्षिण व पश्चिम या दोन दिशांची संगमदिशा असल्याने
तेथे अत्याधिक ऋणभारित ऊर्जेचे स्थान आहे. म्हणजेच
पश्चिम - नैऋत्य - दक्षिण हा दिशाप्रभाग ऋणऊर्जायुक्त
होतो.
पूर्वदिशा मोकळी, हलकी तसेच , जलमय असल्यास वास्तूस
अत्याधिक प्राणिक ऊर्जा प्राप्त होते. पूर्वेकडील
उतार, अंगण, बगीचा , अधिकाधिक खिडक्या जमिनीलगतच्या
खिडक्या यांद्वारे जास्तीत जास्त प्राणिक ऊर्जा
लाभते. उत्तम शरीरस्वास्थ्य , मनाची एकाग्रता, चित्ताची
प्रसन्नता लाभते. अचूक निर्णय, उत्तम कार्यकुशलता
यामुळे प्रगतीपथ आक्रमणास आरंभ होतो. अडथळे आपसूकच
दूर होतात की काय असा अनुभव येतो .प्रसन्नता, पावित्र्य,
ध्यानधारणा, तेज याची मक्तेदारीच जणू काय या दिशेने
घेतलेली आहे . नित्याची महत्वाची कामे करताना, अभ्यास
, स्वयंपाक , ध्यानधारणा, पूजा - अर्चा , महत्वाच्या Meetings, मुलाखती देताना पूर्व दिशेकडे तोंड
करण्यास सांगणे यामागे या दिशेचे सूर्यमय , उगवतीचे
असणे, अंधकारातून प्रकाशाकडे जाणारे असणे, अज्ञानातून
ज्ञानाकडे , तेजाकडे झेपावणारे असणेच अभिप्रेत
आहे.
याविपरीत पूर्व दिशा बंद असणे, या दिशेस चढ असणे
, पर्वत असणे, खिडक्या आकाराने लहान असणे, पूर्वेस
टॉयलेट असणे, पूर्वेकडील जिन्याने या दिशेस जडत्व
येणे, पूर्वेला Overhead टाकी ,माळा, भिंतीवरील जड
कपाटे, अवजड यंत्रे, सामान, जड फर्निचर यांमुळे पूर्वेच्या
प्राणिकऊर्जा प्रवाहांमध्ये बाधा येते. शरीरस्वास्थ्यावर
व मन:स्वास्थावर विपरीत परिणाम होऊन अवनीती चालू
होते.
वरील विवेचनावरुन सहज स्पष्ट होते की उगवत्या सूर्याची
प्रशस्त सूर्यकिरणे आपल्यास व आपल्या वास्तूस लाभण्याकरिता प्रयत्नशील
असावे.
(यापुढील लेखांत पूर्वेसह सर्व दिशांचे वास्तुशास्त्रीय
महत्व विस्तृतपणे जाणून घेऊच. )
वर्षारंभीच घडणारे महत्वाचे संक्रमण म्हणजेच ’मकरसंक्रांती’.
या दिवशी सूर्य मकरराशीत प्रवेश करतो. दिवसाचे दिनमान
वाढू लागते. कामाचा उत्साह द्विगुणित होतो. यानंतर
लगेचच येणार्या माघ शुद्ध सप्तमीला ’भानुसप्तमी’,
’सूर्यसप्तमी’, ’ रथसप्तमी’, ’आरोग्यसप्तमी’ असे
म्हणतात. हाच दिन ’ जागतिक सूर्यनमस्कार दिन ’ म्हणून
साजरा होतो. सुर्याविषयी कॄतज्ञता दर्शवण्याचा
हा दिवस . सूर्याला अर्घ्य देऊन सूर्यनमस्कार करून
, सूर्यस्नान करुन ही सौरऊर्जा आपण घेतली पाहिजे.
हाच रथसप्तमीचा संदेश.
माझे गुरुवर्य ज्योतिर्भास्कर श्री. जयंतराव साळगावकर
यांनी आपल्या धर्माची मूळ विचारधारा लोकांच्या
मनावर बिंबवण्याकरिता सगळ्यांनी मिळून एक उपासनामार्ग
स्वीकारावयास सांगितला आहे. सूर्य जगाचा आत्मा
आहे . आपण सूर्यौपासक आणि यज्ञोपासक आहोत. पंचप्रणवयुक्त
गायत्री मंत्राची किमान एक जपमाळ प्रत्येकाने जपावी.
याकरिता जवळजवळ १ लाख रुद्राक्षांच्या माळा विनामूल्य
वाटण्याचा संकल्प आहे. ज्यांना गायत्री मंत्राचे
उच्चारण जमणार नाही त्यांनी ’ श्री सूर्यनारायणाय
नम: ।’ हा मंत्र जपावा.
"भ्राजिष्णवे विश्वहेतवे नम: । ’ संपूर्ण विश्वाचे
कारणरुप अशा दीप्तीमान सूर्यनारायणाला नमस्कार
असो. |
|
|
वास्तुमार्गदर्शक
बबनराव पाटील
०९८२१३१८५५२ |
|
|
|
|
 |
|
१६ वर्षांहून अधिक काळ डाऊझिंग आणि वास्तुशास्त्राचा सल्ला देण्याचा अनुभव तसेच ’वास्तुपंडित’ आणि ’वास्तु विशारद’ यापदव्यांनी सन्मानित. |
|
|
 |
 |
 |
|
????? ????? ??? ????? ???? ?????????? ?????
???????????????????? ???????? ??????
????? ???????????? ?????????? ????
????????????? ???????? ???? ??? ?????
?????? ???????????? ?????????????
?????? ??????? (???????) ?????
?????????????? ???????? ???????? ?????
????? ??????? ????
???????? ????? ????
????????????? ????????
???????? ???????? ??????
???? ????? ??????????
?????????
????????? ??????????
??????? ???????? ?????????????
??????????? : ????? ????????? ????? ? ??????
??????????????? ????????????? ??????? ???? : ?????? ????????
????????? ??? ??????? ???????? ?????
??????????????? ????????????? ??????? ???? : ?????? ?????
|
|
|
|
|
|
मोबाइल : |
०९८२१३१८५५२
०९८६७४९४६२६ |
|
|
ई-मेल: |
info@vasturahasya.com |
|
|
|
१ वैष्णव निवास,
आकुर्ली क्रॉस रोड नं.२, कांदिवली (पू.) ,
मुंबई - ४००१०१ |
|
|
|
|
|
|
|
|
|
Copyright © Vastu Rahasya. All Rights Reserved |
|
Developed by - Innovins |
|
|
|