Name *
Address *
Email Id *
Contact No. *
Questions
Image Verification
captcha
Please enter the text from the image:
[Refresh Image]
  त्वरीत सल्ल्यासाठी खालील फॉर्म भरा.
 
 
*
*
*
 
 
 
  प्रत्येक अडचणींपासून वाचण्यासाठी युक्त्या आणि सल्ले
 
 
*
*
 
 
गणेशाचे अवतार, गाणपत्य संप्रदाय, परंपरा यांची माहिती देणाऱ्या आणि
गणेशाचे वाहन मूषकच का ?
दुर्वा एकवीसच का ?
मोरयाला एकच दात का ?
या प्रश्नांची उत्तर देणाऱ्या चौकटी, सचिन तेंडुलकच्या गणेश भक्तीची माहिती देणारा लेख या ग्रंथात आहे.
   
 
आज फारच मोठी कौतुकाची थाप पाठीवर पडली आणि क्षणभरात सारा क्षीण कुठच्या कुठे पळून गेला. घटनाही तशीच होती. ज्येष्ठ वैज्ञानिक आणि निस्सीम गणेशभक्त पद्मविभूषण डॉक्टर रघुनाथ माशेलकरसरांना "तू सुखकर्ता" हा आमचा श्रीगणेश ग्रंथ भेट करण्याची. माझी धर्मपत्नी आणि ग्रंथाची प्रकाशिका डॉ.(सौ.) नंदिता आणि श्रीवृंदावन शाळेच्या संस्थापिका सौ. आकांक्षा जोशी यांच्या समवेत सरांशी मनसोक्त गप्पा झाल्या. ग्रंथ हातात येताच मुखपृष्ठावरील मोरयावर सरांचा प्रेमाने हात फिरला. पान न् पान चाळून पहाताना, 'सुंदर', 'फारच छान', 'ग्रेट वर्क', 'अप्रतिम' ह्या त्यांच्या शब्दांनी मन आनंदीत होत होते. पुस्तक घेतानाचे अनेक फोटो सरांनी काढून दिले. एवढंच नाही तर, अगदी उत्स्फूर्त दाद म्हणून की काय आपल्या "तू सुखकर्ता"चं तोंड भरून कौतुक करणारे चार शब्दही सर्वांकरता सांगितले,"माझ्यासारख्या गणेशभक्ताकरिता हा ग्रंथ खूप महत्त्वाचा असून जे गणेशभक्त नाहीत, त्यांनाही गणेशज्ञान मिळवून देणारा आहे. असा ग्रंथ मी आजपर्यंत पाहिलेला नाही. येणारी शतकानुशतके हा ग्रंथ वाचकांना गणेशाचे ज्ञान देत राहील. हा ग्रंथ महाराष्ट्रात आणि भारतातच नव्हे,तर जगभरात आपले भारतीयत्वही प्रसारित करेल." "तू सुखकर्ता"ला डॉ. माशेलकरसरांची दीर्घ प्रस्तावना लाभली असून यामध्ये त्यांनी ग्रंथातील गणेश विषयांबरोबरच आपल्याही गणेशभक्तीचे दिलखुलास विवेचन केले आहे.
माहिती आणि तंत्रज्ञान क्षेत्रातील जागतिक दर्जाचे तज्ज्ञ, पद्मश्री, पद्मविभूषण आदरणीय डॉ. विजय भटकर यांना आपला श्रीगणेशग्रंथ "तू सुखकर्ता" भेट करण्याचा आजचा सुदिन. "तु सुखकर्ता" त्यांच्या हातात देताच, सरांनी जवळजवळ ४५ मिनिटे तो पाहिला. ग्रंथ पाहतांना 'सुंदर', 'अप्रतिम' अशा शब्दांची बरसात होत होती. सर पुढे म्हणाले," बबनराव, या ग्रंथाची जागा माझ्या देवघरात आहे."असे म्हणून त्यांनी मला देवघरात नेले व आपला "तू सुखकर्ता" त्यांनी देवघरात देवापाशी ठेवला. त्यांनी एक श्रीयंत्रही मला भेटस्वरूपात दिले. ह्या प्रसन्न आणि हसतमुख व्यक्तिमत्त्वाशी मोकळेपणाने निवांत गप्पा झाल्या (घरातील अगत्यपूर्वक आतिथ्याचा आस्वाद घेत घेत). थोरा-मोठ्यांच्या आशीर्वादाने आणि कौतुकाने अधिकाधिक काम करण्याची प्रेरणा मिळते. मनाच्या आठवणींच्या कुपीत ही हृद्य भेट जतन करतच आम्ही सरांचा निरोप घेतला.
दोन वर्षांपूर्वी श्री गणेशावर ग्रंथ काढावयाचे ठरवले. ग्रंथाचे नावही ठरले- "तू सुखकर्ता". गाणपत्य सांप्रदायाचे उपासक, गाणेश शास्त्राचे अभ्यासक, निस्सीम गणेशभक्त, गणेश मंदिर संस्था, सार्वजनिक गणेशोत्सव मंडळे, इतिहासतज्ञ, पुरातत्त्ववेत्ते, जगविख्यात चित्रकार, छायाचित्रकार, मूर्तिकार, शिल्पकार, सुलेखनकार, साहित्यिक साऱ्यांना एकत्र घेऊन हे शिवधनुष्य उचललं खरं, पण भक्कम आर्थिक पाठबळाशिवाय ग्रंथनिर्मिती केवळ अशक्यप्राय. अशावेळी "बबनराव, तुम्ही ग्रंथाच्या कामाला लागा. मी तुमच्या बरोबर आहे."असे सांगत भक्कमपणे पाठीशी उभे राहणारे एम्.ई.पी. चे सर्वेसर्वा श्री.जयंतराव म्हैसकरसाहेब (म्हणजे श्री गजाननांनी पाठवलेला देवदूतच.) आज श्री.म्हैसकरसरांना "तू सुखकर्ता" भेट दिल्यावर आणि त्यांची कौतुकाची थाप पाठीवर पडल्यावर ग्रंथपूर्तीचा खरा आनंद मिळाला. सर, मनापासून धन्यवाद.
 
         
   
 
सांगलीच्या प्रसिद्ध गणेश मंदिराचे राजे श्री. विजयसिंहराजे पटवर्धन यांच्या निवासस्थानी त्यांच्याबरोबर जवळ-जवळ तीन तास गप्पांची मैफिल जमली. त्यांना आपला "तू सुखकर्ता" हा गणेशग्रंथ सप्रेम भेट दिला. राजेसाहेबांनी जवळजवळ एक तास हा ग्रंथ पाहिला.
आज जगप्रसिद्ध कोकुयोकॅम्लीन लिमिटेडचे उपाध्यक्ष आणि माझे हितचिंतक श्री. श्रीराम शरद दांडेकरसरांना आपला "तू सुखकर्ता" हा गणेश ग्रंथ सप्रेम भेट दिला. रंगांच्या दुनियेचे जनक असणाऱ्या श्री. दांडेकरसरांनी आपल्या "तू सुखकर्ता' ग्रंथातील जगप्रसिद्ध चित्रकारांच्या कुंचल्यातून साकारलेल्या गणेश कलाकृतींचे तोंड भरून कौतुक केले.गाणेशशास्त्र आणि कला तसेच गणेश विषयक मौलिक माहिती देणारा हा ग्रंथ त्यांना मनापासून आवडला.
इंडियन कौन्सिल फॉर कल्चरल रेलेशन्स(ICCR) चे अध्यक्ष ,भारतीय जनता पार्टीचे राष्ट्रीय उपाध्यक्ष व राज्यसभेचे खासदार डॉ. विनय सहस्रबुद्धे यांना "तू सुखकर्ता" प्रदान करताना...... "विनयजी, पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदीजींच्या "थिंक टँक" मधील एक अग्रनामांकित ,उच्चविद्याविभूषित अशा प्रज्ञावंताला, "तू सुखकर्ता" प्रदान करताना ,आम्हाला अत्यंत आनंद होत आहे." सोबत श्री. योगेश जोशी (विनयजींचे बालमित्र व जनसंपर्क क्षेत्रातील जागतिक कीर्तिवंत.)
 
         
   
 
हजारो अनाथ लेकरांची आणि ३५० गायी-वासरांची आई असणाऱ्या सामाजिक कार्यकर्त्या डॉ.सौ. सिंधुताई सपकाळ (माई) यांची आज त्यांच्या सन्मती बाल निकेतनमध्ये भेट घेतली आणि त्यांना आपला "तू सुखकर्ता" हा श्री गणेश ग्रंथ भेट दिला. चहापानादरम्यान माईंनी कथन केलेला त्यांचा जीवनसंघर्ष म्हणजे माझ्यासारख्यांसाठी मोठा प्रेरणास्त्रोतच!१००० हून अधिक अनाथांना आपल्या मायेच्या पदराखाली ऊब देणाऱ्या माईच्या शब्दाशब्दांतून त्यांच्या मातृत्वाचा निर्धार लख्खपणे दिसतो. आपल्या पोटच्या ममताला श्री दगडूशेठ हलवाई ट्रस्टला सुपूर्द करणाऱ्या माईंचे श्रीगजाननांशी जवळचे नाते आहे. ग्रंथ मराठीतून असल्याने मी हा रोज वाचणार, असेही त्या म्हणाल्या. माईंचा निरोप घेताना नकळतच डोळे पाणावले......आईचा निरोप घेतांना पाणावतात तसेच.....
करवीर नगरीतली कालची संध्याकाळ म्हणजे अवर्णनीय आनंद देणारा दुग्धशर्करा योग. आई श्री महालक्ष्मीच्या दर्शनाने पावन झाल्यावर पुढे स्वामी जगद्गुरु शंकराचार्य पीठ,करवीर येथे विद्यमान जगद्गुरू शंकराचार्य श्री.प.प.विद्यानृसिंह भारती स्वामी यांचेही आशीर्वाद घेतले.स्वामींना आपला "तू सुखकर्ता" हा गणेशग्रंथ भेट दिला. ह्या ग्रंथास यापूर्वीच स्वामींचे पत्ररूप आशीर्वचन लाभले आहे. स्वामींनी ग्रंथाचे तोंड भरून कौतुक केले.
राजमान्य राजेश्री शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांना आमचा गणेशग्रंथ "तू सुखकर्ता" भेट देण्याचा आजचा सुदिन. सकाळपासूनच भेटीविषयी अनामिक अशी हुरहुर लागून गेली होती. या गुरुतुल्य व्यक्तीस भेटण्याविषयीचे दडपण काहीसं आलं होतच.पर्वतीच्या पायथ्याशी पुण्यातील त्यांच्या निवासस्थानी पोहोचल्यावर मात्र आपल्याच घरात आलो आहोत की काय इतक्या आपुलकीने बाबासाहेबांनी स्वागत केले. ग्रंथाचे पान अन् पान पाहताना अलगद त्यांचा हात अनेकदा माझ्या डोक्यावरून फिरला."तू सुखकर्ता"हा साल २०१८मधील मी पाहिलेला सर्वोत्कृष्ट प्रकाशित ग्रंथ असून मोरयाचा प्रसादच जणूकाही मला लाभला आहे, असे गौरवोद्गार त्यांच्या मुखातून निघाले. "हा ग्रंथ पाहून मी इतका आनंदित झालो आहे की मला शब्दच सुचत नाहीत," असेही ते म्हणाले. साक्षात शब्दप्रभूंनी असे कौतुक केल्यावर क्षणभर मीही रोमांचित झालो. बाबासाहेबांशी मनसोक्त गप्पा झाल्या. त्यांची कौतुकाची थाप आणि आशीर्वाद घेत मी त्यांची रजा घेतली .....ही भेट आठवणींच्या कुपीत सदैव जपून ठेवत ........
 
         
   
 
महाराष्ट्राचे राज्यमंत्री गृह,(ग्रामीण) व वित्त (नियोजन), नामदार श्री. दिपक केसरकर यांना आमचा श्रीगणेशग्रंथ "तू सुखकर्ता" भेट करताना, (सोबत "वर्ल्ड कम्युनिकेशन फोरम" -दावोस स्वित्झर्लंडचे पुनर्निर्वाचित चेअरमन आणि असोसिएशन ऑफ बिझनेस कम्युनिकेटर्स ऑफ इंडियाचे (ABCI) प्रेसिडेंट श्री. योगेश जोशी)
२७ फेब्रुवारी म्हणजेच मराठी भाषा दिनी "तू सुखकर्ता" या आपल्या श्रीगणेश ग्रंथास संपादित- प्रकाशित केल्याबद्दल मराठी वृत्तपत्र लेखक संघ, मुंबई यांच्यावतीने दादर सार्वजनिक वाचनालयाचे विश्वस्त श्री. दत्ता कामठे आणि जे.जे. स्कूल ऑफ आर्टचे श्री.गजानन शेपाळ तसेच मराठी वृत्तपत्र लेखक संघ, मुंबईचे अध्यक्ष श्री. रवींद्र मालुसरे यांच्या शुभहस्ते सन्मानित होण्याचा बहुमान मिळाला.
मराठी भाषा, साहित्य, समीक्षा आणि संस्कृती यांच्या जतन आणि संवर्धनासाठी केली ११३ वर्षे कार्यरत असणार्‍या मराठी साहित्य परिषदेतर्फे प्रतिवर्षी साहित्य संस्थेच्या वर्धापनदिनी उत्कृष्ट ग्रंथनिर्मितीसाठी कै.गोखले स्मृती पुरस्कार प्रदान करण्यात येतो. या वर्षीचा हा पुरस्कार आपल्या "तु सुखकर्ता" ह्या श्री गणेशग्रंथाने पटकावला. काल, २६मे रोजी, पुण्यात महाराष्ट्र साहित्य परिषदेचे अध्यक्ष आणि ज्येष्ठ विचारवंत डॉ. रावसाहेब कसबे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या पुरस्कार वितरण सोहळ्यात सरस्वती सन्मान प्राप्त झालेले प्रसिद्ध गुजराती साहित्यकार श्री. सीतांशू यशश्चंद्र यांच्या शुभहस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. ग्रंथ निर्मिती करताना मोलाचे सहकार्य करणाऱ्या माझ्या सर्व सहकाऱ्यांचे मनापासून आभार.
 
         
   
 
पुण्याचे प्रसिद्ध उद्योगपती श्री. अविनाश भोसलेसाहेबांना भेटण्याचा योग आला. आपला "तू सुखकर्ता" हा गणेशग्रंथ यांना सप्रेम भेट दिला. सोबत मोरगावच्या मयुरेश्वर मंदिराचे पुजारी श्री. किशोर वाघगुरुजी.सरांनी संपूर्ण ग्रंथ पाहून त्याचे मनापासून कौतुक केले..
श्री सिद्धिविनायकाचे दर्शन घेतले.दर्शनोपरांत श्री सिद्धिविनायक गणपती मंदिर न्यासाच्या कार्यकारी अधिकारी सौ. प्रियांका कुलकर्णी- छापवाले तसेच मंदिर न्यासाचे वित्त व लेखा अधिकारी श्री महेश विजय पवार यांचीही भेट घेतली. त्यांना आपला "तु सुखकर्ता" हा श्री गणेश ग्रंथ भेट दिला..
कुलदेवी आई तुळजाभवानीच्या गाभाऱ्यात जाऊन तिची सपत्नीक षोडशोपचार पूजा करण्याचे आणि साडी व खणा-नारळाने ओटी भरण्याचे भाग्य लाभले. "तू सुखकर्ता" हा आपला श्रीगणेशग्रंथ आईच्या श्रीचरणी समर्पित करून मंदिर संस्थानाच्या ग्रंथालयाला भेट करण्यात आला. .…जय जगदंब.….
 
         
   
 
श्रीमंत दगडूशेठ हलवाई ट्रस्ट गणपतीची आरती घेण्याचे भाग्य लाभले."तू सुखकर्ता"या आमच्या गणेशग्रंथाची प्रत मोरयाच्या चरणी अर्पण केली.यावेळी ट्रस्टतर्फे माझा सत्कार करण्यात आला. ट्रस्टचे श्री. गोडसेसाहेब आणि कोषाध्यक्ष श्री.महेश सूर्यवंशी यांच्यासोबत ग्रंथाविषयी चर्चा करतांना आणि तो भेट देताना...
ज्येष्ठ क्रीडा समीक्षक आणि लेखक श्री. द्वारकानाथ संझगिरी
स्वामी गोविंददेव गिरी(पुणे) यांची भेट झाली. या भेटीमध्ये त्यांना 'तू सुखकर्ता' हा ग्रंथ सप्रेम भेट दिला .स्वामी हे अयोध्या येथील होणाऱ्या राम मंदिराचे विश्वस्त आहेत ,तसेच ते कोषाध्यक्ष आहेत. सर स्वामींनी आपल्याला आशीर्वाद दिले आहेत. आपल्या ग्रंथांचे मनापासून कौतुक केले आहे. जवळजवळ दोन तास आमची चर्चा चालली होती.
 
         
   
         
  १६ वर्षांहून अधिक काळ डाऊझिंग आणि वास्तुशास्त्राचा सल्ला देण्याचा अनुभव तसेच ’वास्तुपंडित’ आणि ’वास्तु विशारद’ यापदव्यांनी सन्मानित.  
     
       
  मोबाइल : ०९८२१३१८५५२
०९८६७४९४६२६
 
  ई-मेल: info@vasturahasya.com  
 
१ वैष्णव निवास,
आकुर्ली क्रॉस रोड नं.२, कांदिवली (पू.) ,
मुंबई - ४००१०१
 
       
       
   
     
  Copyright � Vastu Rahasya. All Rights Reserved   Developed by - Innovins