 |
 |
|
त्वरीत सल्ल्यासाठी खालील फॉर्म भरा.
|
|
|
|
|
|
 |
|
प्रत्येक अडचणींपासून वाचण्यासाठी युक्त्या आणि सल्ले
|
|
|
|
|
|
 |
|
|
 |
|
डाऊझिंग म्हणजे लपवलेल्या गोष्टी पाहण्याची कला. इतरवेळी , डाऊझिंग हे डाऊझिंग काठी, सळई किंवा पेंडुलम यांच्या सहाय्याने केले जाते.
- वास्तुशास्त्र दोष व भूमितील घातक पाण्याचे प्रवाह कसे शोधायचे?
- वैयक्तिक निर्णय, शिक्षणकल, करियर, व्यवसाय इत्यादी संबंध जाणून घ्या डाऊझिंग शास्त्र महत्वाचे निर्णय घेण्यास कशी मदत करते?
- व्यवसायामध्ये यश, अभ्यासात सुधारणा, वैयक्तिक सुधारणा, कौटुंबिक सांमजस्य आणि चांगल्या स्वास्थ्याकरीता वास्तु मार्गदर्शन
वास्तुशास्त्राच्या दृष्टिकोनातुन प्लॉट सिलेक्शनचे
जे निकष लावले जातात त्यात त्या प्लॉटच्या अंगी
असलेल्या ऊर्जेचा विचार आपल्याकडील वास्तुतज्ञांपैकी
जवळजवळ कोणीही केलेला दिसत नाही. प्लॉटच्या म्हण्जे
ह्या जमिनीच्या तुकडयाची उर्जा मोजण्यासाठी निरनिराळी
उपकरणे - गिगर म्यूलर , स्किंटिलेशन काउंटर , बोलोमिटर
, थर्मिस्टर , रडार , बेकन्स पेंड्युलम , लॅकर अॅंटेना
इत्यादी वापरली जातात.
ही उपकरणे नुसती महागच नाहीत तर ती वापरण्यासाठी
कुशल तंत्राज्ञानही असणे आवश्यक आहे.
ही उपकरणे वापरुन आपल्याला त्या जमिनीच्या तुकडयाची
उर्जा किती आहे हे जरुर समजते; पण ती आपल्याला म्हणजे
त्या लोकांना त्या जमिनीवर घर बांधून राहावयाचे
आहे त्यांना किती टक्के अनुकूल आहे वा प्रतिकूल
आहे हे मात्र अजिबात समजत नाही. हे समजण्यासाठी जे
काही उपयोगी पडते ते म्हणजे डाऊझिंग.
’डाऊझिंग’ हा शब्द टू डाउस ह्या इंग्रजी क्रियापदापासून
तयार झाला. टू डाउस ह्या शब्द्याचा स्थूलमानाने
’ शोध घेणे’ असा अर्थ घेतला आहे. हा शोध घेण्याची
जी क्रिया केली जाते तिला ’ डाउझिंग’ असे म्हणतात.
ही क्रिया जी व्यक्ती करते तिला ’ डाऊझर’ असे म्हणतात.
डाऊझिंग हे शास्त्र मूळचे भारतातलेच. अथर्ववेदात
ह्या क्रियेचा उल्लेख निराळया दृष्टिकोनातून केलेला
आहे. इतर अनेक शास्त्रांप्रमाणेच हे शास्त्रही
भारतातील लोकांनी त्याकडे दुर्लक्ष केल्यामुळे
काळाच्या उदरात गडप झाले. भारतात जरी ह्या शास्त्राचा
पाठपुरावा केला गेला नाही तरी परदेशात मात्र ह्याचा
सखोल अभ्यास केला गेला आणि जातही आहे आणि तो तसाच
पुढेही शंभर टक्के चालू राहणार ह्यात तिळमात्रही
शंका घेण्याचे कारण नाही कारण ह्या शास्त्राधारे
जी माहिती प्राप्त होते त्याची विश्वसनीयता ही
निष्णातांच्या बाबतीत जवळजवळ शंभर टक्के इतकी अचूक
असू शकते. ती तशी असल्यामुळेच इंग्लंड, अमेरिका,
फ़्रान्स , जर्मनी , रशिया इत्यादी विकसीत देशातील
लोकही ह्या शास्त्राधारे निरनिराळ्या गोष्टींचा
शोध घेण्यास उद्युक्त होतात आणि घेतातही.
डाऊझिंग करताना डाऊझर आपल्या सोयीनुसार व उपलब्धतेनुसार
निरनिराळी उपकरणे वापरतात. ह्या उपकरणांतील सर्वात
सोपे, सुटसुटीत कोठेही व केव्हाही हातळता येणारे
उपकरण म्हणजे ’ लंबक’. इंग्रजीत’ ह्याला पेन्डुलम
म्हणतात. काही डाउझर लंबकाला लंबक म्हणण्याऎवजी
लोलक असे म्हणतात. ते तितके बरोबर वाटत नाही कारण
लोलक म्हणजे प्राइम होय पेन्डुलम नाही. ( लोलकाचा
उपयोग डाऊझिंगमध्ये केला जातो पण तो लंबकासारखा
सर्रास नाही.) डाऊझर लंबकाच्या साहाय्याने जास्तीत
जास्त प्रमाणात संशोधन करत असतात. त्यामुळे डाऊझिंगला लोलकविद्या म्हणणे तितके
योग्य वाटत नाही. |
|
|
|
|
|
|
|