Name *
Address *
Email Id *
Contact No. *
Questions
Image Verification
captcha
Please enter the text from the image:
[Refresh Image]
  त्वरीत सल्ल्यासाठी खालील फॉर्म भरा.
 
 
*
*
*
 
 
 
  प्रत्येक अडचणींपासून वाचण्यासाठी युक्त्या आणि सल्ले
 
 
*
*
 
 
   

जसा देवांमद्ये विष्णू आणि नवग्रहांमध्ये सूर्य सर्वश्रेष्ट तसा रुद्राक्ष परिधान करणारा व आपल्या पूजास्थानात रुद्राक्ष ठेवणारा हा मानवांमध्ये श्रेष्ठ समजला जातो. रुद्राक्ष म्हणजे साक्षात भगवान शिवशंकराचे आशीर्वाद लाभलेला जीवनदायी निसर्गाने मानवतेला बहाल केलेला नजराणा आहे. रुद्र आणि अक्ष म्हणजे रुद्राक्ष. या दैवी बीजांमध्ये संपूर्ण ब्रह्मांडाच्या उत्क्रांतीची रहस्ये दड्लेली आहेत असे म्ह्टले जाते.



एकमुखी रुद्राक्ष:
भगवान शंकराचे प्रतिनिधित्व करणारा असा एकमुखी रुद्राक्ष त्याचा तिसरा डोळा मानलेला आहे. एकंदरच सुखशांती आणि कल्याणाकरिता हा उत्कृष्ट मानला आहे. याचा इतर वैशिष्ट्यपूर्ण लाभ नाही. हा तीन प्रकारचा असतो. सर्वाधिक मागणी असणारा असा हा रुद्राक्ष आहे.




 

दोनमुखी रुद्राक्ष:
या रुद्राक्षामध्ये दोन नैसर्गिक रेषा असतात. ते एकत्रितरीत्या शिव व पार्वतीचे द्योतक आहे व त्यास अर्धनारीनरेश्वर असे संबोधितात व ते मीलनाचे द्योतक आहे. परस्पर प्रेम-जिव्हाळा वृद्धिंगत करण्याकरिता, द्वैतसंबंध सुधारण्याकरिता याचा उपयोग होतो. यास धारण करणार्‍या व्यक्तीमध्ये इतरांना समजून घेण्याची क्षमता येते. ज्यामुळे त्यास नंतर इतरांकडून सहकार्य लाभते.



 

तीनमुखी रुद्राक्ष:

वरपासून खालपर्यंत तीन नैसर्गिक खाचा असणारा व अग्निदेवतेचे (प्रतिनिधित्व) करणारा असा तीन मुखी रुद्राक्ष. अग्नी ज्याप्रमाणे अशुद्धता नष्ट करतो व स्वत:देखील पवित्र राहतो त्याचप्रमाणे तीनमुखी रुद्राक्ष सदैव पवित्र, शुध्द राहतो. निगेटिव्ह विचारसरणी, नैराश्य, ताण, उच्च रक्तदाब, भीती, न्युनगंड, दुर्भाग्य, वाईट विचार दूर सारून पॉझिटिव्ह विचारधारा सुरू होते. क्रोध शांत करणाऱ्याचा असून धारण करणार्‍या आत्मविश्वास वृद्धिंगत होतो.
कोणत्याही नात्यातील कोणाही व्यक्तीस हा धारणा करता येतो. गुरु-शिष्य, पालक-पाल्य, पती-पत्नी, मित्र, व्यावसायिक ग्राहक, विक्रेते इत्यादी.

 

चारमुखी रुद्राक्ष:
भगवान ब्रह्माचे प्रतीक असणारा व वरपासून खालपर्यंत ४ नैसर्गिक खाचा असणारा हा रुद्राक्ष आहे. सृजनशक्ती, एकाग्रता, जागरुकता, स्मरणशक्ती, हुशारी वृद्धिंगत करणारा हा रुद्राक्ष. विद्यार्थी, कलाकार, लेखक, व्यावसायिक, पत्रकार, शास्त्रज्ञ, आर्किटेक्ट्स, चित्रकार इत्यादींसाठी योग्य आहे.




 

पाचमुखी रुद्राक्ष:

साक्षात शिव-रुद्राचे प्रतीक असणारा हा रुद्राक्ष धारण करणार्‍यास कमालीची आत्मशांती लाभते. रक्तचाप संतुलन राखण्याकरिता व जपाकरिता हा उत्कृष्ट मानला आहे.






 

सहामुखी रुद्राक्ष:

भगवान कार्तिकेयाचे (भगवान शिवाचा दुसरा पुत्र)प्रतीक असणारा हा रुद्राक्ष कारण करणार्‍याची इच्छाशक्ती वृद्धिंगत होऊन नैराश्य, भीती ताण दूर सारले जातात.






 

सातमुखी रुद्राक्ष:

देवी महालक्ष्मीचे प्रतीक असणारा सात खाचा असणारा हा रुद्राक्ष. संपत्ती व भरभराटीची देवी महालक्ष्मीचा प्रतीक. हा रुद्राक्ष धारण करणार्‍यास धनप्राप्ती होऊन दारिद्रयाचा नाश होतो. हा तिजोरीमध्येदेखील ठेवावा. हा सर्वांकरिता अनिवार्य आहे.
आठमुखी व दहामुखी रुद्राक्षासह धारण करावा.




 

आठमुखी रुद्राक्ष:

भगवान गणेशाचे(अष्टविनायक)प्रतीक असा हा रुद्राक्ष. वेदान्तानुसार गणेश म्हणजे विघ्नहर्ता. सर्व विघ्ने दूर सारणारा म्हणून हा रुद्राक्ष धारण करणार्‍यास पुढील लाभ होतो.
व्यवसाय, नातेसंबंध, शिक्षण अशा क्षेत्रांतील अडथळे दूर सारण्यास याचा उपयोग होतो. मनुष्यकाम करतेवेळी असंख्य चुका करतो. विद्यार्थी खूप अभ्यास करूनही साध्या साध्या चुकांमुळे मार्क गमावतो. अशा वेळी या रुद्राक्षाचा लाभ होतो. एखाद्या कामात अडथळा येणे किंवा उशीर होणे असा अनुभव येत असल्यास आठमुखी रुद्राक्ष वावरावा. भगवान गणेश यश देणारा आहे. कोणत्याही कामापूर्वी यास प्रथम पुजले जाते व याचा आशीर्वाद घेतला जातो. म्हणून आठमुखी रूद्राक्षसुद्धा यश व कल्याण घडवून आणतो. ज्योतिषशास्त्रानुसार राहू-केतू पीडा, दुष्ट शनी, मंगळ असल्यासही आठमुखी रुद्राक्षाचा लाभ होतो.

 

नऊमुखी रुद्राक्ष:
शक्तीचे प्रतीक असणारी देवी दुर्गा. तिचे द्योतक असणारा नऊमुखी रुद्राक्ष म्हणजे साक्षात बलशक्तीच. अनेक लाभांकरिता नऊमुखी रुद्राक्ष धारण करतात. नऊमुखी रुद्राक्ष म्हणजे देवीच्या नऊ रूपांचे प्रतीक. तिचे प्रत्येक रूप विशिष्ट स्वरूपात आशीर्वाद देते.
  • याच्या धारणाने नवशक्ती प्रसन्न होऊन सर्व कष्टांचे निवारण करून सुखप्रदान करतात.

  • सातमुखी रुद्राक्ष धारण केल्यावर प्राप्त होणारे सर्व लाभ नऊमुखी रुद्राक्ष धारण करणार्‍यासही लाभतात
  • आर्थिक उन्नती साधते.

  • दुष्ट शक्तींपासून संरक्षण मिळते.

  • स्मरणशक्ती, एकाग्रता, विचारशक्ती, वृद्धिंगत होत असल्याने विद्यार्थ्यांकरिता उपयुक्त.

  • माता-पुत्रसंबंध जिव्हाळ्याचे करण्याकरिता उपयुक्त.

  • रहू-केतू पीडा असल्यास लभदायी.
 

१०
दहामुखी रुद्राक्ष:

साक्षात विष्णुस्वरूप असणारा हा रुद्राक्ष धारणककर्त्यास दुष्ट ग्रह लागणे, वाईट नजर, पिशाच्च, वेताळ, भूत-प्रेत आदी दुष्ट प्रवृत्तिदायक लहरींचा त्रास होत नाही. हा मन:शांतीसाठी व पापग्रहाची बाधा सौम्य होण्यासाठी वापरतात. कायद्याच्या, कोर्टकचेर्‍यांच्या विषयामध्ये लाभदायी. सातमुखी रुद्राक्षासह धारण केल्यास आर्थिक प्राप्ती होते.




 

११
अकरामुखी रुद्राक्ष:

साक्षात हनुमानस्वरूप असणारा हा रुद्राक्ष शारीरिक व मानसिक बल, विद्वता, वत्कृत्व प्रदान करणारा आहे. कामाबद्दलची निष्ठा वाढवण्याकरिता तसेच मनातील भीती दूर करण्याकरिता हा धारण करतात. अपघातांपासून संरक्षण देणारा हा रुद्राक्ष धाडसी कार्ये करणार्‍यांकरिता उपयुक्त आहे. शारीरिक व मानसिक बल वाढविणारा असल्याने ध्यानधारणा व योग करणार्‍यांकरिता उपयुक्त. श्रीरामांप्रती सत्यनिष्ठ असणारा श्रीरामभक्त, हनुमान. साक्षात हनुमानस्वरूप असणारा हा रुद्राक्ष कार्याविषयीची श्रद्धा, निष्ठा व प्रेम वृद्धिंगत करतो. शनी व मंगळाचा दृष्ट प्रभाव दूर करतो.

 

१२
बारामुखी रुद्राक्ष:

बारा आदित्यांचे प्रतीक म्हणजे हा रुद्राक्ष. साक्षात सूर्यदेवतास्वरूप म्हणूनच तेज:पुंज व्यक्तिमत्त्व प्रदान करणारा आहे.
  • भगवान सूर्यनारायण आत्मा, इच्छाशक्ती, प्रतिष्ठा, धैर्य, निर्णयक्षमता, पितृत्व यांचा कारक. हे कारकत्व वृद्धिंगत करण्याकरिता बारामुखी रुद्राक्षाचा फायदा होतो.

  • हा धारण करणार्‍यास प्रेरणा, जिद्द, शासकत्व, नेतृत्व, निर्णयक्षमता, आत्मविश्वास व प्रतिष्ठा प्राप्त होते.

  • आदित्यस्वरूप असा हा तेजस्वी प्रकाशमय रुद्राक्ष धारणकर्त्यास सदैव दशदिशांनी प्रकाश देतो व सर्वच क्षेत्रांमध्ये तेज, ओज व बलसंपन्न बनवतो.

  • राजकर्ते, कायदेतज्ज्ञ, व्यापारी, अधिकारी व्यक्तींकरिता लाभदायी असणारा हा रुद्राक्ष प्रतिष्ठा, मानसन्मान प्राप्त करण्याकरिता उपयुक्त आहे.
 

१३
तेरामुखी रुद्राक्ष:

साक्षात कामदेवस्वरूप असणार्‍या या रुद्राक्षास मदनदेव समजतात. साक्षात मदनदेवाचाच आशीर्वाद लाभल्याने जीवनातील सात्त्विक अभिलाषा पर्ण होतात व राजसी मानसन्मान प्राप्त होतो.
  • व्यापारी, व्यावसायिकांना भरभराटीकरिता उपयुक्त आहे.

  • कुवतीच्या तुलनेने कमी यश पदरात पडणे, लाभ एका विशिष्ट पातळीवर येऊन ठप्प होणे अशा समस्यांकरिता तेरामुखी रुद्राक्ष वापरावा. यशाची उंचच उंच शिखरे पार केली जातील.

  • प्रेमसंबंधात साफल्यासाठी वापरतात.

  • नाव, मानमरातब प्राप्त करण्याकरिता तसेच राजकीय महत्त्वाकांक्षा असणार्‍यांकरिता उत्तम.
 

१४
चौदामुखी रुद्राक्ष:

शारिरीक व मानसिक स्वास्थ्य राखण्याकरिता उत्तम.
  • साधकाने याचा विधिपूर्वक वापर केल्यास अंत:चक्षूंचे उन्मीलन होऊन भविष्य जाणण्याची दृष्टी लाभते.

  • बल, विद्वत्ता, निर्णयक्षमता, वक्तृत्व, निष्ठा प्रदान करतो व भीती दूर घालवतो.

  • विपत्ती व दुर्घटनांपासून संरक्षण प्रदान करतो. म्हणून धाडसी कार्ये करणार्‍यांनी जरूर धारण करावा.

  • शारीरिक, स्वास्थ्यप्राप्ती होत असल्याने ध्यानधारणा व योग करणार्‍यांनीही धारण करावा.

  • कार्याप्रती निष्ठा व प्रेम वृद्धिंगत होते.

  • अद्योरीविद्या, पिशाच्चादी बाधेपासून संरक्षण लाभते.

  • शनी व मंगळाच्या दुष्ट प्रभावांपासून रक्षण लाभते.
 

१५
पंधरामुखी रुद्राक्ष :

साक्षात पशुपतिनाथस्वरूप असा हा रुद्राक्ष शारीरिक व मानसिक आरोग्यरक्षणासाठी उपयुक्त आहे. यास धारण केल्याने अंत:चक्षूचे उन्मीलन होऊन भविष्य जाणण्याची दृष्टी लाभते. यामुळे योग्य दिशेस योग्य निर्णय घेणे शक्य होते. ऊर्जा, बल व शक्ती प्रदान करणारा हा रुद्राक्ष आर्थिक उन्नतीसाठीही उपयुक्त आहे.





 

१६
सोळामुखी रुद्राक्ष:

याला कालविजयाचे प्रतीक मानतात. हा धारण केल्यास सर्वत्र विजयप्राप्ती होते.

  • हाती घेतलेल्या कामात, नवीन कामांमध्ये यश प्राप्त होते.

  • शैक्षणिक, आरोग्यविषयक समस्यांमध्ये तसेच भीती दूर करण्यासाठी हा धारण करतात.

  • दीर्घकाळ रेंगाळलेल्या कायदेविषयक समस्या सुटण्याकरिता हा उपयुक्त आहे.

  • हा अतिशय दुर्लक्ष रुद्राक्ष संपूर्ण घराला विजयपथावर नेतो. बहुउपयोगी असा हा रुद्राक्ष सर्वांकरिता उपयुक्त आहे.
 

१७
सतरामुखी रुद्राक्ष:

साक्षात विश्वकर्मास्वरूप असा हा रुद्राक्ष. बांधकाम, गृहरचना, नगररचना यांच्याशी संबंधित आहे. भगवान ब्रह्माचा पुत्र असलेला भगवान विश्वकर्मा हा अखिल जगताचा अभियंता असून देवांच्या सर्व राजवाडयांचे स्थापत्य याने केले आहे. देवतांच्या सर्व श्स्त्रास्त्रांचा निर्माता हाच आहे. महाभारतात यास स्थापत्यकला तज्ज्ञ, हस्तकला तज्ज्ञ, देवांचा स्थापत्य तज्ज्ञ, अलंकारनिर्माणकर्ता असे मानले आहे.

  • शाही, ऎषआरामाचे आयुष्य जगण्याची इच्छा असल्यास, संपत्ती, भौतिक सुखांचा उपभोग घ्यायचा असल्यास हा धारण करावा.

  • अनपेक्षित लाभ घडवून आणण्याची याची क्षमता मालमत्तासुख, वाहनसुख, अलंकारसुख,धनलाभ घडवून आणते.

  • कला, निर्मिती, संगीत, चित्रकला, स्थापत्यकला, इंटिरिअर डिझायनर्स, अलंकारनिर्मिती, हस्तकला यांतील तज्ज्ञांना अत्यंत लाभदायी. स्टॉक ब्रोकर्सकरिता उपयुक्त
 

१८
अठरामुखी रुद्राक्ष:

साक्षात धरित्रीमातास्वरुप असा हा अत्यंत दुर्मीळ रुद्राक्ष आहे.

  • हा धारण केल्यास आरोग्य, यश, भरभराट प्राप्त होते.

  • जमिनीशी संबंधित व्यवहार तसेच उद्योगांमद्ये लाभदायी.

  • मालमत्तेसंबंधित व्यवहार करणारे, ब्रोकर्स, एजंट्स, बिल्डर्स, वास्तुज्ज्ञ, कॉन्ट्रॅक्टर्स, हिरे-रत्‍नांचे व्यापारी, ज्वेलर्स, जमीनदार, शेतकरी तसेच जमिनीशी संबंधित उद्योग करण्याकरिता अत्यंत अनुकूल.

  • संततीसुख प्राप्त करण्याकरिता उपयुक्त.
 

१९
एकोणीसमुखी रुद्राक्ष:

साक्षात नारायणस्वरूप असा हा रुद्राक्ष. लक्ष्मीप्राप्तीकरिता, भरभराटीसाठी उपयुक्त. हा अत्यंत दुर्मीळ रुद्राक्ष आहे.







 

२०
वीसमुखी रुद्राक्ष:

अत्यंत दुर्मीळ असा हा भगवान जनार्दनस्वरूप रुद्राक्ष सर्वच क्षेत्रांमध्ये यश प्रदान करणारा आहे. व्यापारी व उद्योजकांकरिता लाभदायी
असा एकवीसमुखी रुद्राक्ष; भगवान कुबेर आणि धनवंतीस्वरूप असा हा रुद्राक्ष. साक्षात कुबेराच्या कृपेमुळे संपत्तीचा लाभ होतो. तर भगवान धन्वंतरीकृपेमुळे आरोग्यसमस्या सुटतात. व्याधिप्रतिकारशक्ती वाढते. हा दुर्मीळ रुद्राक्ष आहे.



 

२१
एकवीसमुखी रुद्राक्ष:

भगवान कुबेर आणि धनवंतीस्वरूप असा हा रुद्राक्ष. साक्षात कुबेराच्या कृपेमुळे संपत्तीचा लाभ होतो. तर भगवान धन्वंतरीकृपेमुळे आरोग्यसमस्या सुटतात. व्याधिप्रतिकारशक्ती वाढते. हा दुर्मीळ रुद्राक्ष आहे.





 

२२
बावीसमुखी रुद्राक्ष:

अत्यंत दुर्मीळ असे हे रुद्राक्ष क्वचितच निसर्गात आढळतात. हे रुद्राक्ष इतके दुर्मीळ आहेत की बाळगणे तर दूरच पण त्यांचे दर्शनही दुर्लभ आहे.
त्रिजुडी रुद्राक्ष; अत्यंत दुर्मीळ असा हा रुद्राक्ष.यमध्ये तीन रुद्राक्ष एकमेकांना जोडलेले असतात. जे ब्रह्मा, विष्णू आणि महेशाचे प्रतीक आहे. चमत्कारिक परिणाम देणारा हा रुद्राक्ष सर्वात श्रेष्ठ असा आहे.




 

गौरीशंकर रुद्राक्ष:

रुद्राक्ष वृक्षावर निसर्गत:च जोडलेल्या अवस्थेत निर्माण होणारा हा रुद्राक्ष साक्षात शिव व पार्वतीस्वरूप आहे.

  • घरातील परस्पर प्रेम, पती- पत्‍नींचे संबंध वृद्धिंगत करण्यांकरिता हा धारण करतात.

  • हा बहुउपयोगी रुद्राक्ष आहे. याच्यावर अनेक मुखे असल्याने त्या मुखांनुसारही हा फळ देतो.

  • योगमार्गातून परमेश्वराशी द्वैत साधण्याकरिता ऋषीमुनी हा धारण करतात.
 

गणेश रुद्राक्ष:

मनोकामनापूर्ती आणि मांगल्यकारक असा हा दुर्लभ रुद्राक्ष. श्रीगणेशाच्या सोंडेप्रमाणे साकार झालेला हा दिव्य रुद्राक्ष अत्यंत उपयुक्त आहे. हा धारण केल्यास किंवा पूजेत ठेवल्यास गणपती प्रसन्न होऊन सर्व मंगल होते. गणेशाचे प्रतीक असलेला हा रुद्राक्ष विघ्नकारक आहे. जीवनातील विघ्नांची किंवा अडथळ्यांच्या मालिकेने कामे बारगळत असल्यास श्रध्दापूर्वक या रुद्राक्षाच्या धारणेने जीवनात सुखसमृद्धी नांदते.




 

गर्भगौरी रुद्राक्ष:

माता-अपत्य नातेसंबंध घट्ट करण्याकरिता उपयुक्त. संततीसुखाकरिता उपयुक्त असा हा रुद्राक्ष आहे.
रुद्राक्षासंबंधित गैरसमज.
  • हा स्त्रियांनी धारण करू नये. रुद्राक्ष हा सर्वांकरिता कल्याणकारी आहे. तो स्त्री-पुरुष दोघेही धारण करु शकतात.

  • रुद्राक्ष धारण केल्यावर मदिरापान, मांसांहार सेवन व विषयसेवन करू नये. असा नियम नाही; परंतु केवळ श्रद्धेपोटी, आदरभावाने असा नियम मानवाने बनविला. याचा कोणताही दुष्परिणाम होत नाही.

  • खरा रुद्राक्षदेखील त्याच्या विशिष्ट गुरुत्वानुसार पाण्यावर तरंगू शकतो. तसेच खोटा रुद्राक्षसुद्धा पाण्यात बुडू शकतो. म्हणून ही चाचणी निष्फळ आहे.

  • तीन गोल एकमुखी रुद्राक्ष प्रतिवर्षी नेपाळमध्ये निर्माण होतात. आमच्या महितीप्रमाणे यात तथ्य नाही.

  • खर्‍या रुद्राक्षावर शिवलिंग, त्रिशुल व ॐ असतात. ही ग्राहकांना आकर्षित करण्याकरिता लढवलेली शक्कल असून ९९.९% रुद्राक्षावर ही चिन्हे असतील तर ती कोरलेली असतात. जे सहजच ओळखता येते. यदाकदाचित जर निसर्गत:च अशी चिन्हे रुद्राक्षावर आढळली तरी ती प्रत्येक वेळी जुळ्वून आणणे शक्य नाही.

  • नेपाळमध्ये रुद्राक्ष खरे व परिणामकारक असतात. तर इतर ठिकाणचे रुद्राक्ष खोटे व निष्फळ असतात. नेपाळी रुद्रांक्षांचा व्यापार करणार्‍यांनी निर्माण केलेली ही अफवा आहे. सर्व नेपाळी रुद्राक्ष हे इंडोनेशियन रुद्राक्षांपेक्षा अधिक परिणामकारक असतात असे कुणीहि छातीठोकपणे सांगू शकत नाही नेपाळी रुद्राक्ष हे इंडोनेशियन रुद्राक्षांपेक्षा अधिक महाग असतात. त्यामुळे त्याच्या विक्रीतून अधिक पैसा मिळत असल्याने असा समज समाजामध्ये पसरवला गेला आहे.

  • नेपाळी साधू, ऋषीमुनींनी नेपाळी आश्रमांतून येणारे रुद्राक्ष खरे असतात. या म्हणण्यात काही तथ्य नाही, केवळ साधूकडून प्राप्त झाला किंवा नेपाळ्मधून आपल्यापर्यंत पोहचला म्हणून तो रुद्राक्ष असली असे म्हणणे चुकीचे आहे. कारण सर्वाधिक नकली रुद्राक्षदेखील नेपाळ्मधूनच विकले जातात.

  • कुंडली, ज्योतिषशास्त्राच्या आधारे रुद्राक्ष धारण करावा. प्रत्येक रुद्राक्षाचा गुणधर्म, उपयोग वैदिक ग्रंथांमध्ये नमूद केलेला आहे. त्याचा वापर करून रुद्राक्ष धारण करावा. याकरिता ज्योतिषाचा आधार घेणे आवश्यक नाही.

  • रुद्राक्ष धारण केल्यावर नियमांचे पालन केले नाही तर त्याचे दुष्परिणाम भोगावे लागतात, ही अंधश्रद्धा आहे. रुद्राक्ष धारण केल्यानंतर नियम पाळ्ण्याची आवश्यकता नाही.

  • कलेक्टर रुद्राक्ष हा मूळ किमतीतच मिळतो. आकाराने मोठया असणार्‍या रुद्राक्षाला कलेक्टर रुद्राक्ष म्हणतात. पण खरं तर खरोखरच मोठया आकाराचा व वैशिष्टयपूर्ण असल्याखेरीज त्यास कलेक्टर रुद्राक्ष म्हणता येणार नाही.

  • महाग रुद्राक्ष अस्सल असतो. हा एक चुकीचा समज आहे. रुद्राक्षाच्या किमती सहज कमी-जास्त करणे शक्य आहे.

  • काही व्यापारी स्वत:ला रुद्राक्षाचे राजे मानतात. असे मानून काही व्यापारी पैसा कमवितात. भगवान शिवाशिवाय रुद्राक्षाचा कुणीही राजा नाही आणि देवाने ते सर्वांच्या कल्याणाकरिता निर्माण केले आहेत.

  • प्रत्येक रुद्राक्षाबरोबर गॅरण्टी सर्टिफिकेट असलेच पाहिजे. स्वत: कंपनीच आपल्या नावाखाली रुद्राक्षाकरिता सर्टिफिकेट बनवते. म्हणजे स्वत:च स्वत:ला ए.बी.बी.एस. असल्याचा दाखला दिल्यासारखे आहे. अशा सर्टिफिकेटना काहीही महत्त्व नाही. याला शासनाची मान्यता नाही. अशी सर्टिफिकेट्स खोटया रुद्राक्षांनादेखील देता येतील.

  • प्रदर्शनातील व्यापारी त्यांचे शर्ट, कुर्त्याबरोबर रुद्राक्ष परिधान करून ते पवित्र, श्रद्धाळू आहेत असे भासवून आपण रुद्राक्षविक्रीकरिता समर्पित आहोत असे दाखवितात. खरं तर आमची अशा व्यापार्‍यांना विनंती आहे की, रुद्राक्ष शरीराजवळ स्पर्श करेल अशा प्रकारे धारण करावा. परंतु विक्रीकरिता प्रदर्शन करू नये.
वरील गैरसमज किंवा अंधश्रद्धांचे प्रकटीकरण करून रुद्राक्ष खरेदी करणारे व रुद्राक्षांवर खरी श्रध्दा असणार्‍यांना मार्गदर्शन लाभावे केवळ या हेतूनेच हे कथन केले आहे.
 
     
  १६ वर्षांहून अधिक काळ डाऊझिंग आणि वास्तुशास्त्राचा सल्ला देण्याचा अनुभव तसेच ’वास्तुपंडित’ आणि ’वास्तु विशारद’ यापदव्यांनी सन्मानित.  
     
       
  मोबाइल : ०९८२१३१८५५२
०९८६७४९४६२६
 
  ई-मेल: info@vasturahasya.com  
 
१ वैष्णव निवास,
आकुर्ली क्रॉस रोड नं.२, कांदिवली (पू.) ,
मुंबई - ४००१०१
 
       
     
       
     
  Copyright © Vastu Rahasya. All Rights Reserved   Developed by - Innovins