Name *
Address *
Email Id *
Contact No. *
Questions
Image Verification
captcha
Please enter the text from the image:
[Refresh Image]
  त्वरीत सल्ल्यासाठी खालील फॉर्म भरा.
 
 
*
*
*
 
 
 
  प्रत्येक अडचणींपासून वाचण्यासाठी युक्त्या आणि सल्ले
 
 
*
*
 
 
  आजकाल ज्याचा अनेक प्रकारांनी बोलबाला होत आहे व जे अनेकांकडून अभ्यासले जात आहे असे वास्तुशास्त्र गेल्या काही वर्षांपासून लोकांच्या मनात घर करुन आहे. वास्तुशास्त्र म्हणजे वास्तूचे शास्त्र. साहजिकच जर हे शास्त्र वास्तुचे म्हणजेच रचनेचे आहे तर मग व्यक्तीच्या आरोग्याशी याचा संबंध कसा? वरकरणी असा प्रश्न मनात येणे साहजिकच आहे परंतू शास्त्राचे खरे स्वरूप लक्षात घेतल्यास या शंकेचे निरसन होण्यास वेळ लागणार नाही. वास्तूशास्त्राचा संबंध अष्टदिशांशी आहे. या अष्टदिशांचे नाते पंचमहाभूतांशी आणि नवग्रहांशीसुद्धा. आपले शरीर हे सुध्दा पंचमहाभूतांनी बनलेले आहे. पंचमहाभूतात्मकमिदं शरीरम, सहाजिकच या शरीराचा अष्टदिशांशी अन्योन्य संबंध आहे. घरातील अष्टदिशांचा उपयोग करून पंचमहाभूतांनुसार घराची आखणी केली तर या तत्वांचा लाभ त्यांच्या नैसर्गिक स्वभावानुसार घराला मिळतो.

घराचे ऊर्जेशी नवसंजीवक नाते जोडले जाते. सूक्ष्मातिसूक्ष्म प्राणशक्तीचा लाभ मिळून निरामय जीवनाची उपलब्धी होते.
वास्तुशास्त्र आणि आरोग्य यांचा परस्परसंबंध जाणून त्यानुसार अनेक उपाय मी सुचविले वास्तुशास्त्राचे वैद्यकशास्त्राशी असलेले जवळचे नाते पाहुन मीही थक्क झालो. अनेक आरोग्याविषयक समस्यांची उकल या शास्त्राने चुटकीसरशी केली आहे.

काही दिवसांपुर्वी एक ३५-४० वर्षांचे जोडपे काहीशा त्रस्त मन:स्थितीतच मला भेटण्याकरिता आले. पतिमहाशयांची मुख्य तक्रार होती निद्रानाश.

त्यांना डोकेदुखी आणि Acidity त्रास सुरू झाला होता. माझ्या संशोधक वृत्तीमुळे त्यांच्या घराचा आराखडा व झोपण्याची दिशा याबद्दल जाणून घेतले.
Bedroom मध्ये शिरताक्षणीचा Bed च्या बरोबर वर भिंतीवर सिलिंगलगत असणार्‍या लाकडी कपाटाने लक्ष वेधून घेतले मी वहिनींना विचारले,"हे कपाट केव्हापासून येथे आहे." त्यावर त्यांनी तीन महिन्यांपुर्वी घरातील जास्तीचे सामान राहावे म्हणून कपाट बनवून घेतल्यास सांगितले. हे जोडपे उत्तरेला डोके करुन झोपत आहे हेही कळले.

वस्तुशास्त्रानुसार दिशांचे महत्त्व जोडप्याला पटवून देऊन दक्षिणेला डोके करून झोपण्यास सांगितले तसेच नविन लकडी कपाटामुळे विकतचे दुखणे मागे लावून घेतल्याचेही सांगितले आणि बेड कपाटाच्या खाली येणार नाही असा सरकवून ठेवण्याचा सल्ला दिला. अर्थात दोन्ही तोडग्यांकरिता खिशाला कात्री लागणार नव्हतीच म्हणूनच की काय त्या जोडप्याने हा प्रयोग करुन बघण्याची त्वरित तयारी दाखवली. नंतर केवळ १० दिवसांतच पतिमहाशय भेटायला आले व विकार मुळातून गेला तसेच डोकेदुखी आणि Acidity त्रासदेखिल कमी झाल्याची शुभवार्ता दिली. Acidity, ह्र्दयरोग, निद्रानाश, शिर:शूल, उच्च रक्तदाब, प्रमेह, अनेक लैंगिक समस्या तसेच निपुत्रिकत्व, कन्यासंतती या व अशा अनेक शारीरिक समस्यांचे मूळ वास्तुशास्त्रात आढळते.

वास्तूचा शुभाशुभ प्रभाव वास्तूमध्ये वास्तव्य करणार्‍या व्यक्तीच्या मनावर पडतो. अशुभ प्रभावामुळे चिडचिडेपणा, नैराश्य, भय, संशयीवृत्ती,चिंता यांसारख्या रिपूंचा जन्म होतो. वास्तूमध्ये आढळणारी दिशादृष्टी ही अनेक अनारोग्यकारक फळांचे बीज आहे.
दिशादुष्टी कशी होते हे जाणण्यापुर्वी दिशांचा स्वभाव, दिशांचे पंचमहाभूतात्मक संघटन जाणून घेणे आवश्यक आहे.

दिशांचे नवग्रहांशी असलेले नाते उलगडणे आवश्यक आहे. खालील आकृतीवरुन हे सहज स्पष्ट होईल.


दिशाप्रभाग
दिशांचा ग्रहाशी असलेला संबंध पुढील आकृतीवरुन स्पष्ट होईल. वस्तुशास्त्रानुसार उत्तर व पुर्व या ऊर्जेच्याउगम दिशा आहेत. पूर्वेस प्राणिक ऊर्जेचा तर उत्तरेस जैविक ऊर्जेचा उगम आहे. म्हणूनच ईशान्य दिशेस दोनही धनऊर्जांचा संगम दिसून येतो. त्याचप्रमाणे दक्षिण व पक्ष्चिम या ऊर्जेच्या अस्तदिशा आहेत. अर्थातच नैऋत्य ही दिशा अत्याधिक ऋण प्रवाहांचे मीलन दाखवते. अष्टदिशांचा द्विऊर्जाप्रवाहांशी, पंचमहाभूतांशी व नवग्रहांशी असलेला संबंध समजून घेऊनच वास्तूरचना करणे श्रेयस्कर आहे.

ईशान्य ही शिवप्रधान दिशा आहे.जलतत्वाच्या या दिशेचे माहात्म्य विशेष आहे. ऊर्जेची प्रमुख उदगम दिशा, जलतत्व, शिवाचे स्थान, देवघर, प्रार्थना, संकल्प, साधना या बहुविधदृष्ट्या या दिशेस सर्वश्रेष्टत्व साम्राज्ञीस्वरुप आले आहे . सामान्यात: समृध्दी व वैभव प्रदान करणारी ही एक सात्विक दिशा आहे. देवघर, अभ्यासिका, पाण्याचा,औषधांचा साठा, Undergroundटाकीचे स्थान यासाठी ही जागा उत्तम. परंतु या दिशेला जर अन्य तत्व आले तर... Toilet, कर्त्या पुरुषाची Bedroom या दिशेस आली तर साहजिकच मानवी आरोग्य बिघडवणार्‍या व्याधींचा ससेमिरा चालू होतो. येथील शयनकक्षामुळे स्त्री-पुरुषांना कामाविषयाबाबत कटुता, अल्प संततीसौख्य तसेच अनेक लैंगिक समस्या यांतून नैराश्य पदरी पडते.

बुध्दिमांद्य, शैक्षणिक अवनती, प्रगतीमध्ये अडथळे येथील दुष्टतत्वामुळे भोगावे लागतात. ईशान्य दुष्ट घरामध्ये घरातील किमान एका व्यक्तीस तरी तीव्र डोकेदुखी हमखास असतेच. घराची पूर्व दिशा बंद असेल किंवा जड असेल तर वेळोवेळी अनेक अडथळ्यांना सामोरे जावे लागते. साहजिकच प्रगतीचा आलेख घसरणीला लागतो. त्यामुळे अकारण चिडचिड, थकवा, ग्लानी येणे व औदासीन्य यांचा पाठलाग सुरु होतो. प्राणिक ऊर्जा प्रावाहांमध्ये खंड पडल्यामुळे स्फूर्ती, चैतन्य, बुध्दी यांची क्षती होते. डोके काम करत नाही, अशी परिस्थिती उद्भवते. याउलट पुर्वप्रासादामुळे सुर्याच्या सर्वश्रेष्ट शक्तिमय ऊर्जेचा वरदहस्त लाभल्याने नवनव्या उपक्रमांकरिता मनाची उभारी भरार्‍या घेऊ लागते. प्रखर बुध्दिमत्तेचे आविष्करण कामांमध्ये दिसून येते व उत्तरोत्तर प्रगतीचे टप्पे पादाक्रान्त करणे शक्य होते. प्रसन्न मन:स्वास्थाचा परिणाम शरीरस्वास्थावर होऊन तब्येत ठणठणीत राहते.

उत्तर दिशा ही ऊर्जेची प्रमुख उगमदिशा (जैविक ऊर्जा) असून चंद्राचा अंमल या दिशेवर आहे. ’सोम’ही शीतलत्व प्रदान करणारी देवता वास्तुपुरुषमंडळात याच दिशेत आढळून येते. जलतत्वाच्या या दिशेवर ’गुरु’चा प्रभाव प्रकर्षाने आढळून येतो. ’कुबेराचे’ स्थान असणार्‍या या दिशेचा अधिपती बुध आहे. ही दिशा सर्व सिध्दींची कारकच आहे.

पैसा हा आधुनिक युगात ईश्वरस्वरुप मानला आहे. अर्थहीन व्यक्ती समाजात कवडीमोलाच्या बनतात. पैसा येणे व तसाच निघून जाणे यामुळे मनात चिंता निर्माण होते. हीच चिंता सर्व व्याधींचे मुख्य कारण आहे. उत्तर, उत्तर-वायव्य, ईशान्य या दिशांतील दोष आर्थिक समस्यांना निर्माण करुन चितेसम चिंतेलाच आमंत्रण देतात. उत्तर, वायव्य,पक्ष्चिम वायव्य या सर्व दिशांच्या अयोग्य व तत्वविरोधी रचनेमुळे ह्रुदयविकार, रक्तदाब, पतिपत्नींमधील दुरावा,मुलांच्या आरोग्याला अपाय, तसेच विवाहाबाबत प्रयत्न करुनही असमर्थता, यामुळे वाढते नैराश्य, परिणामी घातपात अथवा घटस्फोट, आत्महत्येसारख्या कुमार्गाचे अवलंबन केल्याचे दिसुन येते. स्त्रियांच्या बाबतीत नैराश्येचा कहर झाल्यास Hysteria सारखे मानसिक आजार उद्भवू शकतात.
उत्तर दिशेस Hall, Studyroom, पाण्याचा साठा, तिजोरी असणे उत्तम. पति-पत्नींची Bedroom, Toilet , Kitchen असू नये. उत्तरेच्या पती-पत्नीच्या Bedroom मुळे कामविषयक कटुता निर्माण होतो. या प्रभागात संडास आल्यास नैसर्गिक ऊर्जाप्रवाहांना बाधा येऊन सर्व गणितच विस्कळित होते. संशय, विक्षिप्त स्वभावात, Career मधील घसरणीत याचे प्रतिबिंब उठते. उत्तर-ईशान्य-पूर्व या ऊर्जेच्या उगमदिशा असल्याने या दिशांमधील दोषांचा मन:स्वास्थावर विपरीत परिणाम होतो.

उपाय:-
१) पुर्वेच्या ऊर्जाप्रवाहांना चालना देण्याकरिता रवीच्या माणिक रत्नाची व मंगळाच्या पोवळ्यांची उत्तरेच्या ऊर्जाप्रवाहांना चालना देण्याकरिता चंद्राच्या मोतीची स्थापना करावी.


२) उत्तर, पूर्व व ईशान्य या दिशा प्रभागांमध्ये श्वेत संगमरवराची फरशी बनवून त्याखाली चांदी व गुरुनिदर्शक जस्त तर पुर्वेस श्वेत संगमरवरी फरशीखाली पोवळे व धातूमध्ये ’ताम्र’ धातू पुरावा
.
३) पुर्वेला लाकडाचे Paneling तर उत्तर व ईशान्येस आरसा, स्फटिक, झुंबर, कारंजे(पाणी) यांचा कलात्मक वापर करावा. त्यादृष्टीने येथे ’ईशान्यपात्राची’ योजना स्वागतार्हच आहे.

४) पूर्व, ईशान्य उत्तरेतील वास्तूदोष निवारणाकरिता अनुक्रमे रवी, गुरु व चंद्राची व बुधाची उपासना करावी. या ग्रहांच्या रत्नांचा वापर वेगवेगळ्या प्रकारे करावा तसेच या ग्रहांची यंत्रे भिंतीवर लावावीत.
५) पुर्वेला वडाचे Bonsai तर उत्तरेला प्लक्षवृक्षाची योजना करावी.
६) उत्तर दिशा बंद तसेच Bedroom, जिना याने जड व दुष्ट असल्यास या प्रभागात Boring, विहीर, जलपुष्करणी यांची निर्मिती करावी.
७) पुर्वदोषांकरिता सूर्यापासून अर्घ्यदान, सौरसूत्कांचे वाचन तर उत्तर दोषांकरिता मन एकाग्रतेकरिता प्राणायाम करावा. ईशान्य दोषांकरिता शंकराची उपासना करावी.
सूर्यस्तोत्र

जपाकुसुमसंकाशं काश्यपेयं महाद्युतिम्‌ ।

तमो रिंसर्वपापघ्नं प्रणतो स्मि दिवाकरं‌ ॥
गुरुस्तोत्र
देवानां च ऋषीणां च गुरु कांचनसंनिभम्‌ ।
बुध्दिभूतं त्रिलोकेशं तं नमामि बृहस्पतिम्‌ ॥
बुधस्तोत्र
प्रियडगुलिकाश्यामं रुपेणा प्रतिमं बुधम्‌ ।
सौम्यं सौम्यगुणोपेतं तं बुधं प्रणमाम्यहम्‌ ॥

बरेचदा लहान मुले, वृध्द माणसे यांना सतत आजार पाठीशी लागलेला असतो. काही पालक दर महिन्यातून तीन-चारद

बालरोगतज्ज्ञांचे उंबरठे झिजवत असतात. औषधोपचारानंतर ४-५ दिवस बरे व नंतर व्याधी चलून राहते. विशेषत: अग्निमांद्य, पोटाचे विकार, अतिसार, बद्धकोष्ठता यांसारख्या विकारांचे मूळ पुर्व तसेच पुर्व-आग्नेयेस आहे. या आजारांकरिता अनेकही कारणे आहेत परंतू दिशापुष्टी महत्वाची गोष्ट आहे.

आग्नेय दिशा ही मुळातच अग्नितत्वाची दिशा आहे. तेजतत्वाचा प्रत्यय या दिशेस येतो. अग्नी हा दाहक आहे आणि उबदारही. रजोबलामुळे शुक्र, पराक्रमी मंगळ हे आग्नेयेस असणारे ग्रह अग्निरुप आहेत.

आग्नेय दिशा ही स्वयंपाकघर, लहान मुलांची बेडरुम,व्यायामाची जागा असावी, या उलट जर येथे कर्त्यापुरुषाचे बेडरुम, पाण्याचा साठा आल्यास अगर ही दिशा वाढ अथवा कट असल्यास आग्नेयदुष्टी घडून येते.

आग्नेयदुष्ट असल्यास व्यक्तीच्या तेजतत्वाची अपरिमित हानी आढळून येते. या कोपर्‍यात पाण्याचा साठा असला तर अपमानाच्या अनेक प्रसंगांना समोरे जाण्याची पाळी येते. यातूनच पुढे न्यूनगंड तसेच निगेटिव्ह विचारसरणी उदयास येते.

उत्तम व्याधीप्रतिकरशक्ती(व्याधिक्षमत्व दिसेअसे
Resistance Power ) हे आग्नेयप्रासादाचे वैशिष्ट्य आहे. आग्नेयदृष्टीजन्य दुर्बल व्याधीप्रतिकारशक्तीमुळे शरीर वारंवार रोगांना बळी पडते. पथ्यापथ्याचे नियम पाळूनही व्याधीचा बीमोड करणे कठीण जाते.

आग्नेयेस अग्नी सुप्त स्वरुपात असल्याने त्यास लाल रंगसंगतीच्या माध्यमातून प्रकट करणे आग्नेयदुष्ट करणारे आहे. आग्नेय किचनमधील एका किचनमध्ये अत्यधिक लाल रंगाचा वापर किती महाग पडावा-तर वाढलेल्या पाचकाग्नीने खाण्यावर ताळतंत्र राहिले नाही आणि सरतेशेवटी वेट
Wait Reduction Center चा रस्ता धरण्याची पाळी आली.

संततिसौख्याचा विचार करताना वास्तूशास्त्रात आग्नेय, पूर्व व नैऋत्य दिशाप्रभागांचा विचार करावा लागतो. अग्निकारकत्वामुळे ही उपदिशा शुक्राच्या प्रजननप्रक्रियेस जोडलेली आहे. वंध्यत्वाचा विचार करतेवेळी प्रामुख्याने पुर्व-आग्नेय सहभाग महत्वाचा आहे. आग्नेयेस संडास,
Bathroom, Terrace, विहीर, Boring, अशी परिस्थिती असता निपुत्रिकत्व वा नि:संतान परिस्थिती उद्भवते. त्याचबरोबर पूर्वबंद, पूर्वजड, पूर्व-उंच अशा पूर्वेच्या विपरीत सहभागाचा परिणाम वंध्यत्वाच्या फळात वाढ करतो

स्त्रियांमध्ये चिडचिडेपणा, अशांतता, रक्ताल्पता,रक्तप्रदर अशी अशुभ फळे आग्नेयदुष्टीमुळे मिळतात. अशुध्द अग्नितत्व आपल्या मूळ स्वभावानुसार क्रोध, संताप,चिंता या आरोग्यास अपायकारक अपत्यांना जन्म देते.

वाढीव आग्नेय प्रभावामुळे अग्नितत्वाच्या दाहक परिणामाने वास्तूचे नियमन बिघडते. अग्नीमुळे अपघात, अग्निभय वाढीव आग्नेयेशी निगडित असुन त्याची जरुर दखल घ्यावी.

उपाय:-
१) आग्नेय वाढीव प्रभागाकरिता या दिशेस पांढर्‍या रंगाचा अथवा हिरव्या रंगाचा वापर करावा. लक्षात ठेवा, आग्नेयेकडील अत्याधिक लाल रंगसंगती (लाल
Gas Cylinder लाल माठ, लाल Tiles, लाल रंगाच्या Sunmica चे Furniture, अंगणाच्या आग्नेयेस लाल रंगाच्या फुलाचे झाड इ.) वाढीव आग्नेयेप्रमाणेच फळे देते.
२) आग्नेय कट असल्यास रत्नाध्याय करुन घ्यावा. या दिशेस पुष्कराज व पोवळे जमिनीखाली विधिवत पुरावे.
३)आग्नेयदुष्ट अर्थात या दिशेस विहीर,
Underground टाकी, Boring, Toilet, आल्यास ती बुजवण्याचा प्रथम प्रयत्न करावा. ते शक्य नसल्यास पुष्कराज रत्नाची स्थापना विधिवत करावी. आग्नेयेस Balcony, Bedroom आल्याससुध्दा पुष्कराज रत्नाचा वापर करावा.
४) आग्नेयदुष्टीत पुरुषसूत्काने त्रिकोणाकृती
Pyramid तसेच त्रिकोणी आकाराच्या कलाकृतींचा वापर करावा
५) या दिशेचा अधिपती शुक्र याची उपासना तसेच शुक्रयंत्राचा वापर करावा.

शुक्रस्तोत्र
हिमकुन्द मृणालाभं, दैत्यानां परमं गुरूम्‌।
सर्वशास्त्रप्रवत्कारं, भार्गवं प्रणमाम्यहम्‌ ॥

दक्षिण दिशा हि जैविक ऊर्जेची अस्तदिशा आहे. अर्थात ही ऋण ऊर्जात्मक दिशा आहे. दक्षिणेचा संकोच जडत्वामुळे, विविध रत्नांद्वारे करुन उत्तरेच्या जैविक ऊर्जेचा गुणात्कर्ष होऊन शुभ फळे पदरात पडतात. पृथ्वीतत्वाच्या या दिशेमध्ये मंगळाचे स्थान प्रभावी आहे. जड वस्तू ठेवायचे स्थान, संडास, कर्त्या पुरुषाचे
Bedroom, या दिशेस चालते.

दक्षिणेला अंगण, मोकळा Plot, उतार अर्थात पत्राची Shed असल्यास अथवा या दिशेतील विहीर, Underground टाकी, Boring, स्वयंपाकघरामुळे ही दिशा दुष्ट होते.

दक्षिण दिशेतील अयोग्य व तत्वविरोधी रचनेमुळे व्यसनाधीनता,दारु,मटका,जुगार अथवा स्त्रीबाबत व्यवहार यांसारखी अनेक व्यसने, व्यसनयोगे अनेक विकार उद्भवतात. सर्वसामान्य कुटुंबधर्मदेखील पाळला जात नाही. प्रमेहासारख्या व्याधी, विषयासक्ती, राक्षसी प्रवृत्ती यांचे वाढते प्रमाण या सर्व घटनांना दक्षिणेसारखी दिशा कारणीभूत ठरते. अनेकानेक प्रलोभनांना बळी पडणे व त्यायोगे शरीरतेज घालवणे या सारखी अनेकानेक रज:तमप्रधान कृत्ये ही दिशा करविते. याम्या याति या मद्वारम । असे दक्षिणेस मृत्युकारक म्हणून ’विश्वकर्मा प्रकाश’ ग्रंथात दिले आहे. अनेक दु:खांचे, दैन्याचे योग आणणार्‍या दिशेच्या गुणदोषांचा परिणाम सर्वाधिक घरातील कर्त्या पुरुषांवर होतो. या दिशेस पीडीत गृहस्थिती असल्यास तात्काळ वास्तूत फेरफार करुन उपाययोजना करावी व येणारे अरिष्ट टाळावे.

नैऋत्य दिशा ही दक्षिण व पश्चिम या दोन्ही अस्त्रदिशांचा संयोग असणारी सर्वाधिक ऋणऊर्जेची दिशा आहे. पृथ्वीच्या प्रजननशीलामुळे ही दिशा म्हणजे शृंगारशालेचे सर्वोत्तम स्थान होय. ऋणऊर्जाप्रवाहांच्या संकोचनाकरिता सर्वाधिक जडत्वाची खोली, जिना या दिशेस चालतो.

नैऋत्य ही पृथ्वीतत्वाची दिशा आहे. स्थिर गुणाची दिशा आहे. अर्थातच नैऋत्य कट असता पृथ्वीतत्वाची हानी होऊन स्थैर्य या प्रमुख गुणाचा अभाव घरामध्ये झालेला दिसून येतो. कोणत्याही कामाचा मोबदला न मिळाल्याने आत्मविश्वासाचा अभाव प्रामुख्याने आढळून येतो. यामुळे भय, औदासीन्य सतत बरोबर असतेच. आळसासारखा शत्रू जवळच वाटतो.
Negative Thinking मुळे उपाय करणेसुध्दा कठीण जाते.

नैऋत्येला विहीर,
Boring, पाण्याचा साठा (Underground), अंगण, छपराचा उतार असल्यास ही दिशादुष्ट होते. या दिशेतील दोषयुक्त रचनेमुळे अनेक लोकांच्या मागे विकारांची सुरुवात होते. Chronic आजार, ज्या व्याधी एकदा का सुरु झाल्या की अक्षरश: मरेपर्यंत पाठ सोडत नाहीत. नैऋत्येला असणार्‍या जलाशयाची सर्वच आचार्यांनी एकमुखाने निंदा केली आहे.

नैऋत्य व्याधिपीडा । नैऋत्येच महाभयम ॥

अशा परिस्थितीत घरात अनेक काळ वास्तव्य करणार्‍या स्त्रीस हमखास सांध्यांचे विकार असल्याचे दिसून येते.

पश्चिम-ही सुध्दा दक्षिणेप्रमाणे ऊर्जेची अस्त दिशा आहे. विवाहसौख्य, भागिदारी व्यवसाय, Court कज्जे या सार्‍यांचे कारकत्व पश्चिम दिशेशी जोडलेले आहे. ऊर्जेची अस्त दिशा असल्याने या दिशेत अधिक जडत्व अपेक्षित आहे. पश्चिमेकडील उतार, मोकळी जागा, वाढीव प्रभाव, विहीर यांमुळे येथील ऋण गुणांचा उत्कर्ष होतो. पतीपत्नींमध्ये मतभेद पुढे त्याची परिणती घटस्फोटात होते सांसारिक सुखांचा लोप असे अनुभव पश्चिम वाढीत अनुभवास मिळते. धंद्यांमध्येदेखील Partner कडून दगाफटका होऊन मन:स्तापाची पाळी येते. वैरभाव वृध्दीस लागतो. यातूनच पुढे निद्रानाश, बेचैनी, ह्रुद्शूल, शिरशूल असे विकार उद्भवतात. पश्चिमेचे दोष अनेकदा Court ची पायरी चढण्यास करणीभूत ठरतात यातूनच पुढे ह्रुदयरोगादि मानसिक तणावजन्य महासंकटांना सामोरे जावे लागते. वेळ, शक्ती, पैसा यांचा गरजेपेक्षा अधिक अपव्यय या दिशादुष्टीमुळे होतो. धीर धरणे कठीण होते व यातूनच भांडणतंट्यांना सुरुवात होते. मानसिक अस्वास्थाचा परिणाम शरीरावर होऊन व्याधींची सुरुवात होते.

उपाय:१) दक्षिण, नैऋत्य, पश्चिमेस Boring, Underground टाकी, विहीर असल्यास ती बुजविणे योग्य. दक्षिण, नैऋत्येचे दोष प्रलयंकारी परीणामाचे असल्याने विषाची परिक्षा घेऊ नये. अगदीच बुजवणे शक्य नसेल तर पृथ्वीतत्वाच्या पुष्कराजाची स्थापना विहिरीत व विहिरीच्या आजूबाजूला करावी. या दिशेकडील फरशीसाठी पिवळ्या रंगाचा वापर करावा तसेच औदुंबराचे झाड जमल्यास दक्षिण, नैऋत्येस लावावे. पश्चिमेस पिंपळाचे Bonsai लावावे.

२ नैऋत्य कट असताही वरिलप्रमाणे पृथ्वीतत्वाच्या पुष्कराजाची विधिवत्‌ स्थापना करुन पिवळी जैलसमेर फरशी व औदुंबराच्या झाडाची योजना करावी. नैऋत्येस ५ ते ७ किलो शिसे पुरावे.
३) दक्षिण, नैऋत्येच्या विहिरीकरिता, Underground Tank करिता घर व विहिर/ Tank यांच्यामध्ये गणेशसूत्काने अभिमंत्रित केलेल्या चतुष्कोणाकृती Pyramid चा वापर करावा. त्याचप्रमाणे विहिर व घर यामध्येसुध्दा ५ते ७ किलो शिसे पुरावे


४) दक्षिण व पश्चिम वाढीव असता, तेथे अंगण, बाल्कनी असता दक्षिणेस वैडूर्य तर पश्चिमेस शनीच्या नीलम रत्नाची स्थापना करावी

५)भौमयंत्राचा वापर दक्षिणदोषांत करावा

६) दक्षिण, नैऋत्य व पश्चिमेच्या दोषांकरिता अनुक्रमे मंगळ, राहू व शनीच्या उपासना तसेच त्यांच्या स्तोत्राचे पठण करावे.

मंगळ्स्तोत्र

धरणीगर्भसंभूतं विद्युत्कान्तिसम प्रभम्‌ ।
कुमारं शक्तिहस्तंच, मड्‍अगल प्रणमाम्यहम्‌ ॥
राहूस्तोत्र

अर्धकार्यं महावीर्यं चन्द्रादित्य विमर्दनम ।
सिंहीकार्भसंभूतं तं राहूं प्रणमाम्यहम ॥
शनीस्तोत्र

नीलांजन समाभांस रवीपुत्र यमाग्रजम ।

छायामार्तण्डसम्भूतं,तं नमामि शनैश्चरम ॥

वायव्य-दिशा ही वायुप्रधान दिशा असुन शब्द, चलत्व हे या तत्वाचे गुण आहेत. मनाचा कारक चंद्र या दिशेचा अधिपती आहे.

Dining Hall, धनधान्यासाठा, उपवर मुलींची Bedroom, तेसेच जिना, कचराकुंडी, संडास, Kitchen, Septic Tank, करिता ही दिशा शुभ असून वायव्येस कर्त्या पुरुषाची Bedroom, विहिर, तलाव व Electric Meter आल्यास वास्तूदोष निर्माण होतात

वाढीव वायव्येमुळे वायुतत्वाच्या चंचल गुणाचा पगडा व्यक्तीच्या स्वभावातून प्रकट होतो. हातात घेतलेले काम तडीस जात नाही, अर्ध्यावरच सोडून दिले जाते. वायव्यवाढ असता घरातील कर्त्या पुरूषावर अत्यधिक प्रवासाची पाळी येण्याने घरच्या सुखांचा उपभोग घेता येत नाही. वायुच्या चलगुणामुळे

साथीचे आजार मोठ्या प्रमाणावर पसरतात. अनेक जीवाणूजन्य विकार, Viral Infection अशा वरचेवर आढळणार्‍या विकांराचा ससेमिरा चालू होतो. या प्रभागातील सांडपाणी, तलाव, विहीर याने तर रोगराई अधिकाधिक पसरण्यास हातभारच लागतो.

वायव्यकट परिस्थिती असता एकाकीपणा नशिबी येतो. मतलबी माणसांचा गराडा सतत राहिल्याने बेसावध राहून चालत नाही. पैसा बुडण्याची पाळी येऊन आर्थिक आपत्तींना सामोर जाण्याची पाळी येते.यातूनच पुढे लोकांवरील विश्वास उडतो. आत्मविश्वाससुध्दा गमावला जाऊन मित्रपरिवार कमी कमी होत जातो. यातूनच पुढे Depression , बेचैनी, अरसिकपणा निर्माण होतो.

वायव्येस दोष असता दूषित आग्नेयेची तीव्र फळे भोगावी लागतात. संततीसुखात बाधा येते.

उपाय : -
१ ) वायव्य कट परिस्थिती असता वायुतत्त्वाच्या बुध , शुक्र व शनी या तीनही ग्रहांच्या रत्नांची योजना करावी . त्या अनुषंगाने पाचू, स्फटिक , नीलम या रत्नांची स्थापना विधिवत करावी . निळ्या रंगांचा वापर अत्यधिक करावा. चांदीची व Wind Chimes वापरुन ध्वनीचा आविष्कार घडवून आणावा.
२ . वाढीव वायव्य प्रभागात श्रीसूक्ताने अभिमंत्रित गोलाकार पिरॅमिडचा वापर करावा.
३. वायव्यदोषाकरिता चंद्राची उपासना, चंद्रयंत्राची योजना करावी. चन्द्रस्तोत्र.
दधिशंखतुषाराभं क्षीरोदार्णवसंभवम्‌ ।
नमामि शशिनं सोम , शम्भोर्मुकुटभूषणम्‌ ॥

ब्रह्यास्थान - हे आकाशतत्वाचे असून ते ( Open To Sky ) असावे असा संकेत आहे. या विपरीत ब्रह्यस्थानावर जडत्व ( जडवस्तू , भिंत , जिना इ. ) असल्यास , ब्रम्हस्थान प्रवेशद्वारासमोर आल्याने उघडे पडल्यास तसेच ब्रह्यस्थानात खड्डा ( उतार ) असल्यास वास्तूदोष निर्माण होतात व संपूर्ण घराचे नियमनच बिघडवून टाकतात . असे घर सर्वनाशास कारणीभूत ठरते त्यामुळे त्वरित हा दोष काढून टाकाणे, हाच उपाय शिल्लक राहतो.

अष्टदिशा व तेथील तत्वप्राधान्य जाणून घेऊन घराची रचना करणे म्हणजे आपल्या वास्तूचे , वास्तूतील व्यक्तींचे निसर्गाशी एक मैत्रीचे नवसंजीवक नाते दृढ होते.

वास्तुतील अनेक लहानसहान गोष्टीसुद्धा आपल्या मनावर आणि शरीरावर खोलवर परिणाम करणार्‍या असतात. साधे झोपण्याच्या दिशेचेच उदाहरण घ्या ना.

प्रक्छिरा:
शयने विद्यादक्षिणो सुसंपदा ।
पश्चिम बहुला चिन्ता हानी मृत्युं तथोत्तरे ॥

पूर्वेकडे डोके करून झोपल्यास विद्या, दक्षिणेकडे डोके केल्यास सुखसंपदा, पश्चिमेकडे डोके केल्यास सुखसंपदा, पश्चिमेकडे डोके करून झोपल्यास चिन्ता लागते असे शास्त्रकार सांगतात .

घरातील हसतमुख , प्रसन्न मुद्रेची गृहिणी अथवा तोच भाव प्रकट करणारे चित्रही शारीरिक व मानसिक थकवा दूर करण्यास कारणीभूत ठरते. तर दीन , चिंताग्रस्त भावमुद्रा अथवा तत्सम चित्र अरति ( बेचैनी ) निर्माण करते. घरातील युद्धप्रंसगाचे चित्र वादविवाद, भांडणतंट्यांना कारणीभूत ठरु शकते. तर एखादे आई व तान्ह्याबाळाचे अथवा गाय-वासराचे चित्र वात्सल्यभाव निर्माण करू शकते, तर राधाकृष्णाची चित्रमय एकरुप शृंगारशालेत ( Bedroom मध्ये ) पतीपत्नींची मने जुळवण्यास कारणीभूत ठरते. माकडचाळे करणारी Cartoons उधळलेले घोडे हरतर्‍हचे Teddy Bear हान मुलाच्या बेडरुमध्येच शोभतात व अनुकूल परिणामकारक ठरतात. या व अशा प्रकारची अनेक प्रतीके दीर्घ संपर्काने आपल्या मनावर खोलवर परिणाम करतात आणि आलस्य , नैराश्य , वैरभाव , ईर्ष्या , मोह , मत्सर यांसारख्या मनोविकारांवर उपचारच करतात.

वास्तुशास्त्राला केवळ पंचमहाभूतांनुसार वास्तूची रचना , विविध प्रतीकांचा कलात्मक वापर करून दोषनिराकरण करणे एवढेच अपेक्षित नसून संपूर्ण वास्तू ही चैतन्यमयी, सात्विक लहरींनी परिपूर्ण असणे अपेक्षित आहे. केवळ भौतिक लाभ हे वास्तुशास्त्राला अपेक्षित नसून रजतमप्रधान अशुभ लहरींचे वास्तूतून समूळ उच्चाटन करून सत्वप्रधान स्पंदनांनी , तरंगांनी वास्तूत शुभत्व आणणे अपेक्षित आहे. त्या आनुषंगाने वेदोक्त मंत्रोच्चारांनी वास्तूत प्राणसंचय होऊन चैतन्य फुलते.

आयुर्वेदामध्ये ज्याप्रमाणे पंचकर्म उपचाराने वात, पित्त , कफ या त्रिदोंषाचे शोधन होऊन दोषनिर्हरणच नव्हे तर व्याधी अपुनर्भवचिकिस्ता केली जाते तद्वतच वेदोक्त मंत्रोच्चार , उपासना , दानादि संकल्प, वैदिक कर्मे या सन्मार्गांनी वास्तूस दिव्यत्व प्राप्त करणे शक्य आहे. अशी वास्तूच सुखसंपदा , निरायम आयुष्य प्रदान करून आत्मकल्याणाप्रत नेते.

सर्वे पि सुखिन:सन्तु सर्वेसन्तु निरामय: ।

सर्वेभ्रदाणि पश्यन्तु मा कश्चित्‌ दु:खमाप्नुयात्‌ ।

 
 
वास्तुमार्गदर्शक


बबनराव पाटील

०९८२१३१८५५२
 
  १६ वर्षांहून अधिक काळ डाऊझिंग आणि वास्तुशास्त्राचा सल्ला देण्याचा अनुभव तसेच ’वास्तुपंडित’ आणि ’वास्तु विशारद’ यापदव्यांनी सन्मानित.  
     
       
  मोबाइल : ०९८२१३१८५५२
०९८६७४९४६२६
 
  ई-मेल: info@vasturahasya.com  
 
१ वैष्णव निवास,
आकुर्ली क्रॉस रोड नं.२, कांदिवली (पू.) ,
मुंबई - ४००१०१
 
       
     
       
     
  Copyright © Vastu Rahasya. All Rights Reserved Developed by - Innovins