Name *
Address *
Email Id *
Contact No. *
Questions
Image Verification
captcha
Please enter the text from the image:
[Refresh Image]

Name *
Address *
Email Id *
Contact No. *
Questions
Image Verification
captcha
Please enter the text from the image:
[Refresh Image]
  त्वरीत सल्ल्यासाठी खालील फॉर्म भरा.
 
 
*
*
*
 
 
 
  प्रत्येक अडचणींपासून वाचण्यासाठी युक्त्या आणि सल्ले
 
 
*
*
 
 
  वास्तुशास्त्र म्हणजे वास्तूचे रचनाशास्त्र नसून या शास्त्राद्वारे आपल्या वास्तूमध्ये शुभ लहरी, शुभ स्पंदने प्रवाहित करणे आवश्यक आहे. साक्षात अन्नपूर्णेचा वास आपल्या घरात राहण्याकरिता प्रत्येक गृहिणीने शांत, प्रसन्न चित्ताने ’ अन्नपूर्णा स्तोत्रा ’ चे पठण अवश्य करावे. जेणेकरुन अन्नाची चणचण न भासता घरातील Kitchen चा हा समृध्द कोपरा आबादीआबाद राहील .

घरातील सगळ्यात Active समृध्द कोपरा कोणता असेल तर तो म्हणजे स्वयंपाकघराचा , अर्थातच आपला Kitchen. सकाळचा गरमागरम चहा ते रात्रीचे जेवण, सर्वच गोष्टींची काळजी या कोपर्‍याला असते. तान्ह्याचा खाऊ, दादाताईचा Break fast बाबांचे जेवणातील Special, पाहुण्यांच्या फर्माइशी, देवबाप्पाकरिता मोदक , खरपूस पुरणपोळीची नैवेद्य या सार्‍यांची मक्तेदारी या कोपर्‍याने घेतली आहे. स्वयंपाकघर म्हटल म्हणजे आपल्यासमोर प्रेमाने जेवू घालणारी आई, मायेची वहिनी, दळणकांडण करणारी आजी , कामाची लगबग करणारी सून, सतत हाताशी असणारी लाडकी लेक, स्वयंपाकघरात मदतीला धाव‍णार्‍या शेजारच्या काकू , इतकच काय पण, आजोळची ओढ लावणारी सुगरण मामी सहजच मन:चक्षूंवर तरळतात. आपल्या जिभेचे ( आणि आरोग्याचेही ) लाड पुरवणारी , भरपेट ढेकर देण्यास लावणारी अन्नपूर्णा मग सर्वांनाच घराविषयी ओढ निर्माण करते.

Kitchen चं याविरुध्द असं वेगळ रुपही तितकंच बोलकं आहे. भांड्याला भांडं लागणे, भांड्याची आदळाआपट करणे , वेगळी चूल मांडणे हे धूसफूस दर्शवणारे वाक्यप्रयोगही Kitchen च्याच नशिबी येतात. एकूणच काय, तर कौटुंबिक सत्ता गृहलक्ष्मीच्या हाती तर त्या सत्तेचं केंद्र हे निर्विवादपणे किचन हेच आहे.

वास्तुशास्त्रानुसार Kitchen करिता घरात कोणती दिशा निवडावी तर आग्नेय हे सर्वज्ञातच आहे.

’आग्नेय्यां पाकसदनम्‌ ( विश्वकर्माप्रकाश ) तसेच ’ आग्नेयस्यां स्यान्महानसम्‌ ’ असे उल्लेख ग्रंथांमध्ये आढळतात . असं असलं तरी शास्त्राकारांनी आग्नेयव्यतिरिक्त पूर्व , ईशान्य , उत्तर व वायव्य दिशांमध्येही Kitchen स्थान दिले आहे.

आग्नेय ही अग्नितत्त्वाची दिशा असल्याने घरातील अग्नी (चूल) य दिशेस स्नानापन्न केला आहे. या दिशेस अग्नितत्त्वाचे स्थान असणे हे कारण तर आहेच; परंतु यामागील वैज्ञानिक दृष्टिकोनही तितकाच महत्वाचा आहे.

सूर्यकिरणे जी बाह्यत: सोनेरी भासतात , ती मुळात सोनेरी - पांढरी नसून त्यात सात रंगांच्या छटा आहेत, ज्याला आपण Vibgyor म्हणतो, हे बहुतेकजण जाणतात. या सप्तरंगी Spectrum च्या एका टोकाला (Ultraviolet) किरणांचा पट्टा तर दुसर्‍या टोकाला (Infrared) किरणांचा पट्टा आहे. वास्तुपदविन्यासामधील पूर्वेच्या ९ पदांमधील " शिखी ’ हा कोपरा (Ultraviolet Segment) शी तर अग्नीशी संबंधीत आग्नेय कोपरा ( Infrared Segment) शी संलग्न आहे. (Infrared) किरणे ही आरोग्यास लाभदायी असतात . पुरुषमंडळी कामानिमित्त घराबाहेर पडल्यामुळे सूर्यप्रकाशातील या किरणांचा लाभ त्यांना आपोआप मिळतो; परंतु जुन्या जमान्यात स्त्रियांचे बहुतेक वास्तव्य घरातच होत असल्याने त्यांना या किरणांच्या अनुकूल परिणामांपासून वंचित राहण्याची पाळी येई. तशी पाळी येऊ नये म्हणूनच स्त्रियांचे अत्याधिक वास्तव्य असणारे Kitchen च आग्नेयेस हलवून प्रश्नच मिटवला आहे. त्यामुळे या कोपर्‍यातील Kitchen आरोग्यास हितकारक आहे हे वेगळे सांगावयास नकोच.

असे असले तरी इतरही दिशांमध्ये Kitchen चालते. किंबहुना शास्त्रकारांनी वर्णानुरुप स्वयंपाकघराच्या दिशा ठरवलेल्या आहेत.

ऎशान्यां पचनस्थानं ब्रहम्‌णानां विश्वीयते ।
(बुध्दिजीवी वर्गाकरिता ईशान्येला स्वयंपाकघर असावे. )

आग्नेय्यां पचनस्थानं क्षत्रियाणां प्रशस्यते ।
(शासन करणारे , सैनिकी अधिकारी , पोलिस अधिकारी आदींकरिता आग्न्येचे Kitchen उपयुक्त ठरते . )

नैॠत्यां पचनस्थानं वैश्यानां तु प्रशस्यते ।

(व्यापारी वर्गाचे Kitchen नैॠत्य दिशेस असावे . )

वायव्यां पचनस्थानं शूद्राणां संप्रशस्यते ।
(नोकरदार वर्गाकरिता वायव्येचे Kitchen प्रशस्त मानले गेले आहे. )

मयाने तर आपल्या २७ व्या अध्यायात ’ ऐशान्यां पचनस्थानं सर्वेषां देहि हितम । ’ असे सांगून ईशान्येला स्वयंपाकघराचा गौरव केला आहे .

मानसार या ग्रंथात , ’ उत्तरेशान पर्जन्ये सर्वेषा पचनातयम्‌ । ’ असा श्र्लोक असून त्यात उत्तर , ईशान्य दिशा व पर्जन्य कप्पा सर्वांकरिता Kitchen ला प्रशस्त असल्याचे सांगितले आहे.

वरील सर्व चर्चेवरून असे लक्षात येते, की स्वयंपाकघराकरिता अन्गिदेवाचा अंश असणारी आग्नेय दिशा जरी प्रधान असली तरी ईशान्य , वायव्य , पूर्व , व उत्तर दिशांमध्येही Kitchen ला परवानगी दिली आहे. तरी कृपा करून ज्यांचे Kitchen आग्नेयपूर्वेला नाही अशा वाचकांनी घाबरून खर्चिक तोडफोड करण्याच्या भानगडीत पडू नये.

Kitchen ची घरातील दिशा निश्चित झाल्यानंतर आता त्याची अंतर्गत रचना समजून घेऊया. प्रथम Platform ची दिशा ही पूर्व व उत्तर या शुभ दिशांना असावी, जेणेकरुन अन्न शिजवणार्‍या व्यक्तीचे तोंड पूर्व अथवा उत्तरेस येईल .

आग्नेय Kitchen मध्ये Platform पूर्व - आग्नेय - दक्षिण असा (L) Shape मध्ये असावा.
वायव्य Kitchen मध्ये Platform वायव्य-उत्तरेस व ईशान्येच्या Kitchen मध्ये उत्तर- ईशान्य - पूर्वेस Platform असावा.

Kitchen च्या ओट्याची दिशा निश्चित करतेवेळी तज्ज्ञांनी आग्नेय एके आग्नेय हा हेका कायम ठेवला नसून त्यास पूर्व , उत्तर , ईशान्य या शुभ दिशांमध्येही स्थान दिले आहे. जेणेकरुन चाणक्ष वाचकांच्या हे सहजच लक्षात येईल , की घराच्या मुख्य बाह्यसीमेलगतच Platform येतो. पर्यायाने शेगडीदेखील घराच्या मुख्य बाह्यसीमांलगतच येणार.

वायव्य Kitchen मधील आग्नेय कोपरा हा घराच्या बाह्यसीमेलगत येत नाही तर तो मध्यवर्ती भागात येतो. अशा वेळी Kitchen च्या आग्नेय कोपर्‍यात शेगडी ठेवल्यास अन्न शिजवताना निर्माण होणारा धूर , गंध हा घरभर पसरून त्रास होईल; परंतु सीमेलगत शेगडी असल्याने तसे होणार नाही तर आतील व बाहेरील हवेची योग्य देवाणघेवाण होत असल्याने Kitchen मधील हवा कोंदट न राहता खेळती राहते. शेगडीची जागा निश्चित करतेवेळी ठेवलेला वैज्ञानिक दृष्टिकोण वाखाणण्यासारखा आहे.

Platform नंतर
Platform आढळणार्‍या दोन महत्वाच्या गोष्टींबाबत विचार करणे आवश्यक आहे. त्या गोष्टी म्हणजे शेगडी आणि पाण्याचे Sink.

स्वयंपाकघरात शेगडीच्या बाबतीत मयमतम्‌चे स्पष्ट मत आहे, ’अंतरिक्षे भवेच्चुल्ली ....।’ अंतरिक्ष कप्प्यात (पाद) चूल असावी. अंतरिक्ष कप्पा हा आग्नेय कोपर्‍यानजीकचा पाद. आग्नेयच्या Kitchen मध्ये अग्री पेटविण्याचे ठिकाण आग्नेय टोक नसून त्याच्या अलीकडचा कप्पा हा चुलीकरता निवडला आहे. अर्थात घराच्या आग्नेयेस वा पूर्वेस Kitchen असल्यासच हा नियम लावणे शक्य आहे.

वायव्य उत्तर व ईशान्येच्या Kitchen मध्ये वरीलप्रमाणे शेगडीची जागा निश्चित करु नये. खरं तर वायव्य, उत्तर , ईशान्य या दिशांमधील Kitchen लाही आग्नेय कोपरा आहेच. असे असूनही शास्त्रकारांनी वायव्य व उत्तरेच्य Kitchen मध्ये शेगडी ’रोग’ पादात ( वायव्य कोपर्‍अयातील कप्पा ) तर ईशान्येच्या Kitchen मधील शेगडी पर्जन्य ( ईशान्य कोपर्‍यानजीकचा कप्पा ) पादात ठेवण्याचा सल्ला दिला आहे.

अग्नीनंतर जलतत्वाची दिशा निश्चित करुया. अग्नी आणि जल ही दोन परस्परविरुद्ध तत्त्वे आहेत. त्यामुळे त्यांना एकमेकांच्या हातात हात घालून जवळजवळ स्थानापन्न केल्यास केवळ अनिष्ट फळेच मिळू शकतात. म्हणजेच घरामध्ये कलह , वादावादीची मालिकाच सुरू होते. तरी पाण्याचा साठा आणि शेगडी यांच्यामध्ये किमान २ फुटांचं अंतर राहील एवढी तरी जागा असावी. हे शक्य नसेल तर या दोन तत्वांना एकमेकांपासून वेगळे करण्याकरिता एखाद्या रोपट्याची व्यवस्था या दोन तत्वांमध्ये भिंतीवर करावी. जलतत्वाविषयी दोन गोष्टी प्राधान्याने विचारात घ्यावा लागतात. एक म्हणजे पाण्याचा साठा व दुसरा म्हणजे पाण्याचा उपयोग - वापर. पाण्याचा साठा आणि अग्नितत्व एकमेकांजवळ येता कामा नये; परंतु नळ व अग्नितत्व एकमेकांजवळ चालू शकतात कारण नळाद्वारे पाण्याचा प्रवाह असतो ; पाण्याचा साठा नाही.

आग्नेय व पूर्वेच्या Kitchen मध्ये सिंक डाव्या हातास - जलतत्वाच्या दिशेस - ईशान्येस असावी हे झालेच; परंतु जेव्हा Kitchen अन्य दिशेस - ईशान्येस असावी हे झालेच; परंतु जेव्हा Kitchen अन्य दिशेस असते तेव्हा सिंकची दिशा बदलते.

ईशान्येच्या Kitchen मध्ये सिंकची दिशा दिती किंवा अदिती पादात असावी. अगदी कोपर्‍यात पाण्याचे सिंक असू नये. कारण अगदी ईशान्य टोकास अग्नी हे पाद आहे. उत्तरेच्या Kitchen मध्येदेखील याच पादामध्ये पाण्याचे सिंक असावे.

वायव्येच्या (L) Shape Kitchen मध्ये रोग पादात शेगडी ठेवल्यास उजव्या हाताला पाण्याचे सिंक असावे.

अग्नितत्वाचे मसाले, लोणची , चटण्या, मुरांबे आदींची व्यवस्था आग्नेय कोपर्‍यात दक्षिणेला असावी. फ्रिज अशाप्रकारे ठेवावा जेणेकरुन त्याचे दार पूर्वेकडे अथवा उत्तरेकडे उघडेल. Kitchen मधील जड भांड्यांचे कपाट दक्षिण अथवा पश्चिमेस असावे, जेणेकरूण या दिशा जड होतील. भिंतीवरील कपाटेसुद्घा दक्षिण व पश्चिम भिंतीवर असावीत.

रोजच्या वापरातील भांडी , Crockery पुर्वेकडे असावीत.

Kitchen मध्ये हमखास आढळणारी रचना म्हणजे Loft - माळा. हा दक्षिण व पश्चिमेस असावा. पूर्व किंवा उत्तरेस असणारा माळा या दिशांचे जडत्व वाढवून प्रगतीस अडथळा निर्माण करतो. त्यातही हा माळा जर स्वयंपाक करणार्‍या गृहिणीच्या डोक्यावर आला तर त्या अवयवांची दुखणी चालू होतात. . डोकेदुखी , मानदुखी, खांदेदुखी हमखास आढळतेच. या माळ्यावर पाण्याची टाकी असेल तर प्रश्चच प्रश्न उपस्थित होतात, ज्यांची उत्तरे शोधणे कठीण होऊन बसते. त्यातच ही Overhead पाण्याची टाकी आग्नेय दिशेस आली तर संपूर्ण घरास त्याचे परिणाम भोगावे लागतात. पुंस्त्व शक्तीचा नाश होतो, तेजतत्वाची हानी होते, अपमानाच्या अनेक प्रसंगांना सामोरे जावेलागते. वंध्यत्वाच्या अनेक Caces मध्ये अशी रचना आढळते.

आजकाल सर्रास Gallery मध्ये किंवा भिंतीपुढील Building चा मोकळा भाग घरात घेऊन रुम वाढवल्या जातात व तेथे किचन थाटले जाते. सध्या तर जेवढे घर मोठे तेवढे किचन लहान असा नियमच बनलेला आहे. अग्नीचे वास्तव्य असणार्‍या , धारदार वस्तुची मांडणी असणार्‍या Kitchen मध्ये किमान सुरक्षिततेचा तरी विचार करावा. अशा ओढाताण करून थाटलेल्या Kitchen मध्ये अनेकदा बीम हा स्वंयपाक करणार्‍या व्यक्तिच्या डोक्यावर येतोच व आपले रंग दाखवतोच.

Kitchen मधील रंगसंगतीही महत्वाची आहे. अग्नितत्वाचा वास असणारे Kitchen आग्नेयेस असेल तर लाल रंगाचा अत्यधिक वापर करण्याचा टाळावा. लाल माठ , लाल रंगाचा Sunmica चे Polish चे Furniture , लाल Granite , लाल Tiles, Marble असे लालमलाल आग्नेयेस हितकारक नाही. पण किचन जर आग्नेयेस नसेल तर तेथे मात्र लाल रंगाचा वापर चालतो. आग्नेयेच्ा Kitchen मध्ये लाल रंगाचा माठ इथपर्यंत पुरे ; पण अत्याधिक लाल रंगसंगतीमुळे तापदायक परिणाम पदरी पडतात. कमी लाल रंगाबरोबर हिरव्या रंगाची रंगसंगती ईष्ट परिणामकारक प्रसन्नता आणते. हिरव्या भाज्या, फळे यांची चित्रे असणारी टाइल्स सेट सध्या Market मध्ये सहज उपलब्ध आहेत. त्यांचा वापर करावा.

आग्नेयव्यतिरिक्त इतर दिशांना Kitchen असेल तर मात्र आग्नेयेस त्रिकोणी पिरॅमिड तुपाने भरलेली पळी , पोवळं , तांब्याचे त्रिकोणी आर्टिकल यांचा प्रतीकात्मक वापर आग्नेयेस करावा आण Kitchen मध्ये लाल रंगाचा वापर प्रमाणात असण्यास हरकत नाही.

शास्त्रकारांनी वास्तूतील उपद्वार , पायर्‍या , खोल्या सर्व समसंख्येत असण्यास सांगितले आहे; परंतु Kitchen मध्ये चूल मात्र विषम संख्येत असावी. दोन Burner ची शेगडी असल्यास एक एक्स्ट्रा सिंगल Burner ची शेगडी असावी अथवा तीन ब Burner ची शेगडी आणावी. चार Burner असणारी सध्या मोठ्या प्रमाणात वापरली जाणारी शेगडी शास्त्रसंमत नाही.

वास्तुशास्त्र म्हणजे वास्तूचे रचनाशास्त्र नसून या शास्त्राद्वारे आपल्या वास्तुमध्ये शुभ लहरी, शुभ स्पंदने प्रवाहित करणे आवश्यक आहे. साक्षात अन्नपूर्णेचा वास आपल्या घरात राहण्याकरिता प्रत्येक गृहिणीने शांत , प्रसन्न चित्ताने ’ अन्नपूर्णा स्त्तोत्रा ’ चे पठण अवश्य करावे. जेणेकरुन अन्नाची चणचण न भासता घरातील किचनचा हा समृद्ध कोपरा आबादीआबाद राहील.

 
 
वास्तुमार्गदर्शक


बबनराव पाटील

०९८२१३१८५५२
 
  १६ वर्षांहून अधिक काळ डाऊझिंग आणि वास्तुशास्त्राचा सल्ला देण्याचा अनुभव तसेच ’वास्तुपंडित’ आणि ’वास्तु विशारद’ यापदव्यांनी सन्मानित.  
     
       
  मोबाइल : ०९८२१३१८५५२
०९८६७४९४६२६
 
  ई-मेल: info@vasturahasya.com  
 
१ वैष्णव निवास,
आकुर्ली क्रॉस रोड नं.२, कांदिवली (पू.) ,
मुंबई - ४००१०१
 
       
     
       
     
  Copyright © Vastu Rahasya. All Rights Reserved   Developed by - Innovins