 |
 |
|
त्वरीत सल्ल्यासाठी खालील फॉर्म भरा.
|
|
|
|
|
|
 |
|
प्रत्येक नियतकाळातील अडचणींपासुन वाचण्यासाठी युक्त्या आणि सल्ले
|
|
|
|
|
|
 |
|
|
 |
|
हिंदु संस्कृतीचा महत्वाचा भाग म्हणजे चातुर्वण्य
समाजरचना. ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य, शुद्र साऱ्यांचाच
समाजरचनेत महत्वाचा वाटा आहे. मात्र आपल्या संस्कृतीला
ही चातुर्वण्य विभागणी जन्मावरुन अभिप्रेत नसून
ती ’गुणकर्मश:’ अभिप्रेत आहे.
वास्तुशास्त्राने देखिल चातुर्वण्य समाजरचना
मान्य करुनच (अर्थात् गुणकर्मविभागश:) वास्तुविषयक
विवेचन केले आहे. व्यावसायिक वास्तू कोठे व कशी असावी,
तिची अंतररचना कशी अयाच, याची वर्णन आपण या लेखात
पाहू.
वास्तू मग ती निवासाची असो अगर व्यवसायाची असो. त्या
वास्तूच्या रचनेमागची तात्विक बैठक समान असून ती
समजून घेणे आवश्यक आहे.
वास्तुशास्त्रानुसार उत्तर व पुर्व या उर्जेच्या
उगम दिशा तर दक्षिण व पश्चिम या उर्जेच्या अस्तादिशा
आहेत.
पुर्वेकडून पश्चिमेस प्राणिक उर्जा (धनाउर्जा)
व उत्तरेकडून दक्षिणेस जैविक उर्जा (धनाउर्जा) प्रवाहित
होत असते.
आकृतीत दाखवल्याप्रमाणे पुर्वेकडून येणारी शुभ
किरण ही दक्षिणेकडून येणाऱ्या समान अंतरावरील किरणांना
ज्या ठिकाणी एकमेकांना भेटतात त्या कर्णरेषेपर्यंतच
आपापली प्रभावक्षेत्रे तयार होतात. अशीच स्थिती
दक्षिण-पश्चिम, पक्ष्चिम-उत्तर आणि उत्तर -पुर्व
दिशेकडून येणाऱ्या धन व ऋणशक्तीने भारीत किरणांमुळे
उर्वरित क्षेत्रात उत्पन्न होते.
पुर्व-ईशान्य_उत्तर या दिशा अधिकाधिक मोकळ्या उतारावर
असल्यास प्राणिक व जैविक उर्जा वास्तूत अधिकाधिक
प्रवाहित होतील त्याचप्रमाणे पश्चिम-नैऋत्य दक्षिण
या दिशा अधिकाधिक बंद, जड असल्यासही ऋण उर्जा प्रवाहांना
प्रतिबंध आल्याने वास्तूस अधिकाधिक धनऊर्जेचा
लाभ मिळ्तो. म्हणूनच दक्षिण व पश्चिम दिशा बंद करूनच
बांधकामाचा श्रीगणेशा करावा व अन्य दिशा (उत्तर-पुर्व)
मोकळ्या ठेवाव्यात. त्यायोगे तेथे शुभ (धनभारित)
किरणांचे प्रभूत्व वाढेल. अन्यथा दक्षिण नैऋत्य-पक्ष्चिम
बंद न करता केलेले बांधकाम हमखास दुप्पट पैसा व दुप्पट
वेळ खर्च करवतेच.
वास्तुशास्त्राच्या याच महत्त्वाच्या नियमाचा
आधार घेऊन आपण व्याव्सायिक वास्तुची बांधणी करू
यात.
उत्तर
वायव्य खंड ईशान्य खंड
पश्चिम पुर्व
नैऋत्य खंड आग्नेय खंड
दक्षिण
वास्तुचे प्लॉटमधील स्थाने हे नैऋत्य खंडात असावे.
ज्यामुळे नैऋत्य खंड जड होऊन धनऊर्जा प्रवाहांचा
लाभ वास्तुस मिळेल.
व्यावसायिक वास्तुची उभारणी करत अस्ल्यास बोअर्वेल,
अंडरग्राऊंड टाकीचे स्थानही याच दिशांना (पुर्व-उत्तर-ईशान्य)
असावे. अंडरग्राऊंड टाकीप्रमाणेच उतार, खड्ड यांची
गणना केली जाते.
अनेक कारखानदारी प्लान्टमध्ये मेनगेट पुर्व अथवा
उत्तरेस घेत्ल्याने मागील बाजूस अर्थात नैऋत्य,
आग्नेय कोप्ऱ्यात अंडरग्राऊंड टाकी असल्याचे लक्षात
आले आहे. यातून उद्भवणाऱ्या समस्यांचा पिच्छा सोडविण्यासाठी
मग वास्तुत पाचारण करावे लगते.
या नियमाला अनुसरुनच जीना, ओव्हरहेड टाकी या अनुक्रमे
जडत्व व उंची वाढवणाऱ्या घटकांना पुर्व-उत्तरेस
थारा न देता नैऋत्य कडील दिशा दाखवावी. जेणेकरुन
दक्षिणनैऋत्यादी अस्त दिशा जड झाल्याने अशुभ ऊर्जापासून
वास्तुचे संरक्षण होईल
भूमीप्त्यव अर्थात जमिनीचा उतार
करखानदारी वास्तूकरीता प्लॅन्टच्या निर्मितीकरीता
भूखंड अथवा एखादे माळरान परीक्षणाकरीता अनेकदा
वास्तुत ला पाचारण केले जाते. अशा भूखंडामध्ये
उंचसखलप्रदेश एखादा मोठा खड्डा, उतरता प्रदेश किंवा
मग जमिनीसच उतार (स्लोप) आढळतो अशा रचनांचे दिशानुरूप
स्थान वास्तुतज्ञाच्या चाणाक्ष नजरेतून सुटणार
नाही. एव्हाना आपल्याही हे ध्यानात आले असेलच की,
उतार,खड्डा, दरी हे पश्चिम नैऋत्य-दक्षिण दिशांना
न येता पुर्व-उत्तर-ईशान्येस असावे. तर पर्वत, उंचप्रदेश,
जमिनीचा चढ्यांची दिशा दक्षिण नैऋत्य-पश्चिमेस
असणे हीतावह.
शास्त्रकारांनी भूमीप्त्यवाचे परीणाम विशद करून
सांगितले आहेत. ते आकृतीरुपाने वर्णन करुन दाखवित
आहेत.
एक गोष्ट लक्षात घ्यावी की कोण्त्याही वास्तुकरीता
भूमी समतल असणेच सर्वश्रेष्ठ आहे.
जमिनीच्या चढ-उताराबरोबरच पंचमहाभूतांचे प्राधान्यही
लक्षात घेणे तितकेच महत्त्वाचे आहे.
भूखंडाचे दिशांनुसार खंडवार विभाजन केल्यास. ईशान्यखंड
हा जलतत्वाचा, आग्नेयखंड हा अग्नितत्वाचा, नैऋत्य
खंड हा पृथ्वीतत्वाचा तर वायव्य खंड हा वायु महाभूताचा
असतो. सहाजिकच भुखंडपरीक्षण करतांना ईशान्य-पुर्व-उत्तरेस
जलसाठा (नदी, सरोवर, तळे, विहिर इ.) अस्ल्यास तेथून
प्राप्त होणारी धनऊर्जा वास्तूस लाभकारीच ठरते.
याविपरीत नैऋत्य, दक्षिण पश्चिमेस जर का असा जलसाठा
असेल तर मात्र ऋणऊर्जा प्रवाहांपासून होणाऱ्या
विपरीत परिमाणाची सूचना वास्तुतज्ञास देणे भाग
असते. त्याकरीता करखानदारी प्लॉटकरीता भुखंडपरीक्षण
अतिमहत्त्वाचे अस्ते. आता, प्रत्यक्ष कारखाना/ व्यावसायिक गाळ्याविषयी
पाहू.
या करिता प्रथम एकाशतिपदवास्तुपद मंडळ समजून घेऊ.
भूखंडाच्या लांबीचे व रुंदीचे नऊ समान भाग केले
व समोरासमोर एकमेकांशी जोडले तर भुखंड ८१ पदांत
विभाजित होईल यालाच एकाशतिपदवास्तुपद मंडळ असे
म्हणतात. याच वास्तुपदमंडळात वास्तुपुरुष पालथा
पडला असून विविध पदांमध्ये त्याचे वेगवेगळे अवयव
येतात. (आकृती क्र. ३) या विविध पदांचा आधार घेऊनच
वास्तुची आंतररचना करता येते.
वास्तुपदमंडळातील पालथ्या वास्तुपुरुषाची नाभी,
हृदय, शिर, मुख व दोन्ही स्तन ही स्थाने अतिशय संवेदनशील
असतात. त्यांना ’मर्मस्थाने’ म्हणतात. ’मारयान्ति
इति मर्माणि’ या व्याख्येनुसार वास्तुतील जी स्थाने
विध्द झाल्यावर मरणप्राय संकटे ओढवतात त्यांना
’मर्मस्थाने’ म्हण्तात. या मर्मस्थानी भले मोठे
स्तम्भ पीलर्स किंवा अवजड यंत्रे येणार नाहीत याची
प्रयत्नपूर्वक काळजी घ्यावी (मर्मशूलं च यत्नेन
वर्जयेद् वास्तुकोविद: ।) मर्मस्थानाबरोबरच ब्रह्मस्थानही
(वास्तुपदमंडलातील केंद्रासभोवतालचा भुखंड) मोकळे
राहील अशी बांधकामरचना व अंतर्गत सजावट करावी. वास्तुशास्त्रातील
महत्वाचा नियम ब्रह्मस्थान मोकळे किंवा ओपन टू
स्काय असावे असेच सूचित करतो.
’ब्रह्मस्थानं विनान्योषां सर्वेषां वासयोग्यकम्
।’
वास्तुचा वाढीव भाग व कट्स
प्लॉट हा चैरसाकार अथवा आयताकृती असणेच योग्य असून
या व्यतिरीक्त कोणतीही वाढलेली दिशा अथवा कट्स
हि सदोष वास्तूच दर्शवते. वास्तुमधील कोणतीही वाध
मग ती पुर्व-उत्तर-ईशान्येची असो अगर नैऋत्य-दक्षिण-पश्चिमेची
असो. आग्नेयेची असो अगर वायव्येची, दोषच होय. त्याची
विपरीत फळे मालकाला भोगावीच लागतात. वास्तुच्या
वाढीव प्रभागांच्या विपरीत फळांबाबत अतिशय सुंदर
वर्णन समरांगणसूत्रधारमध्ये आढळते. त्याचा नीट
अभ्यास केल्यास मालकाला भोगव्या लागणाऱ्या अनेक
समस्यांचे कोडे उलगडल्याशिवाय राहणार नाही.
वाढीव प्रभाग परीणाम
पश्चिम वाढ चोरभय धनहानी
आग्नेय वाढ अग्निभय
(शॉर्टसर्किट,स्फोट, आग लागणे इ.)
नैऋत्य वाढ कलह, वादविवाद
वायव्य वाढ नोकरांना त्रास, वाहनांना अपघात
पुर्व वाढ राजदंड
उत्तर वाढ व्यसनाधीनता
दक्षिण वाढ व्याधिग्रस्तता
ईशान्य, उत्तर तसेच पुर्वेकडील वाढ काहीजण शुभत्व
देणारी मानतात. प्रचीन ग्रंथकार मात्र हे दोषदर्शकच
असल्याचे सांगतात. आपल्या व्यापारी मित्रांनी कोण्तेही
दिशा वाढवते वेळी भांडणे, अपघात, चोरी, आग लागणे अशा
गंभीर परीणामांना समोरे जाण्याची तयारी ठेवावी.
कोण्त्याही दिशेतील वाढींबरोबरच त्या त्या दिशांमधील
कट्स ही विपरीत फळे देणारीच असतात. कोणत्याही व्यावसायिकाच्या
यशामध्ये अधिकाधिक धंदा चांगला होऊन लक्ष्मीप्रप्त
करण्याबरोबरच अनेक बाबींची अनुकूलता असणे जसे कष्टाळू,
प्रमाणिक वक्तशीर नोकरवर्ग लाभणे, मालक-नोकर संबंध
तणावरहीत असणे, नोकरांमध्ये सुसंवाद असणे, नोकरांमध्ये
सुसंवाद असणे, उधारी योग्य वेळी असूल होणे, पैशाची
अगर मालाची अफरात न होणे, कर्जबाजारीपणा किंवा आर्थिक
आतत्तींना तोंड देण्याची पाळी न येणे, चोरी, आग त्सेच
इतर अपघातादी घटनांपासून दूर रहाणे. या सर्व बाबींची
पुर्तता होण्याकरीता व्यवसायिकाला व्यवसायिक
मूल्यांबरोबरच वास्तूशास्त्राचे कित्ते गिरवणे
क्रमप्रप्तच आहे
योग्य गाळ्याचि निवड
व्यवसायाकरिता योग्य गाळा निवड करण्याचा प्रश्न
बऱ्याचदा मालकाला असतो. सध्या अनेक शॉपिंग सेंटर्स,
डीपर्टमेंटल स्टोअर्समध्ये नेमका कोणता गाळा खरेदी
करावा हा निर्णय घ्यावा लागतो. पूर्वेचे प्रवेशद्वार
घ्यावे की उत्तरेचे, कोपऱ्यातला गाळा घ्यावा की
मधलाच, दक्षिणेचा दरवाजा असणारा गाळा घ्यावा की
नाही असे अनेक प्रश्न खरेदी करणाऱ्याच्या मनात
असतात. सध्याच्या मॉल्सच्या जमान्यातही कोणत्या
मालाची विक्री नेमकी कोण्त्या दिशेला असावी हा
निर्णय घ्यावाच लागतो.
वास्तूतज्ञांच्या मदतीने योग्य त्या गाळ्याची
निवड करणे श्रेयस्करच असते कारण-
१) कोण्त्याही व्यवसायाचे तत्व आणि त्या व्यवसायाच्या
दिशेचे तत्व समान अस्ल्यास चांगले परिणाम दिसून
येतात.
२) वास्तुमार्गदर्शक द्वारवेधाचा वेध घेतल्यावाचून
राहणार नाही.
३) दुकानासमोर येणारी विथीशुळा (गाळ्याच्या दरवाजासमोर
एखाद्या रस्त्याचा शेवट होणे ) टाळणे शक्य आहे.

निरनिराळ्या दिशांप्रमाणे व्यवसायाचे स्वरुप
आपण जाणून घेऊ. एका चौकासभोवतालच्या गाळ्यातील
व्यवसायाची निवड निवड कशी ते पाहू.
१. पूर्व-ईशान्य : गीफ्ट शॉप्स (काचेच्या वस्तु) , फिशटॅंक
शॉप्स, दुधाची डेअरी , दवाखाना, केमिस्ट , स्टेशनरी
शॉप्स, लायब्ररी , क्लासेस , कपडे पडदे यांची दुकाने
, फर्निचर, शोरुम्स, किराणा दुकान.
२. पूर्व - आग्नेय : हॉटेल, खानवळ , फास्टफुड कॉर्नर,
ईलेक्ट्रॉनिक्स व ईलेक्ट्रिकल वस्तुंची दुकाने,
गिरणी, जिमन्याशिअम , पेट्रोलपंप , तेलाच्या एजन्सीज
, फटाके, स्फोटकांशी संबंधीत दुकाने.
३. दक्षिण - आग्नेय : महिलांसंबंधित व्यावसाय , गारमेंट,
कॉस्मेटीक शॉप्स , ब्युटी पार्लर , ज्वेलरी , लेडीज
बार, परमिटरुम , लॉटरी व्यवसाय.
४. दक्षिण - नैऋत्य : लोखंडाशी संबंधीत व्यवसाय , ग्रॅनाईट,
टायर्स संबंधित व्यवसाय , गॅरेज , कोळशाशी संबंधीत
व्यवसाय , लेदरवर्क्स
५. पश्चिम - वायव्य : पी.सी.ऒ. मोबाईल फोन शॉप्य टेलिकम्युनिकेशन
सेंटर्स, कुरिअर सेवा कॉलसेंटर ट्रॅव्हल एजन्सीज
सेल्य प्रमोशनकरीता असलेल्या नवीन उत्पादनांच्या
वस्तुंचे शॉप्स लवकर विक्रि आवश्य असणारे भाजी,
फळांचे गाळे.
७. उत्तर - बॅका, पतसंस्था, ऑफिसेस , सि.ए. ऑफिसेस, ईस्टेट
एजंट , पैशाच्या व्यवहारांशी संबधित व्यवसाय , मोत्यांचे
व्यापारी.
निरनिराळ्या दिशांप्रमाणे व्यवसाय सांगितले असले
तरी ही शहरी भागात प्रत्येकी वेळी योग्य दिशेचे
गाळे मिळणे शक्य होईलच असे नाही. अशावेळी दुकानातील
अंतर्गत रचना वास्तुशास्त्रानुसार करुन वास्तुगुणोक्तर्ष
घडवुन आणणे निश्चितच आपल्या हातात असते.
त्या त्या दिशांतील दुकानाची प्रवेशद्वारे सध्याच्या
शहर पध्दतीमुळे पूर्णत: उघडी असतात. अशावेळी मात्र
गाळ्याला उंबरठा आहे याची खात्री करुन घ्यावी. शटरच्या
आत दरवाजा काढायचा झाल्यास आकृतीत दाखवल्याप्रमाणे
पूर्वेस (जयंत , महेंद्र), पश्चिमेस (पुष्पदंत , वरूण)
, उत्तरेस (मुख्य , भल्लाट , सोम) आणि दक्षिणेस (गृटक्षत)
या पादांमध्ये असावा.
गाळाच्या दरवाजासमोरिल द्वारवेध व विथीशुळा टाळणे
आवश्यक आहे हे पक्के ध्यानात ठेवा , दारासमोरिल विजेच्या
खांब, एखादे मोठे झाड, खटार गाडी, खड्डा इतकेच काय
पण साक्षात देवाचे मंदिरही दरवाजासमोर अडथळा निर्माण
करून (द्वारवेध) आपला घातक महाप्रत्ताप दाखवल्यावाचून
राहणार नाही.
निवासी वास्तुमध्ये नैऋत्य कोपरा कर्त्या व्यक्तिसाठी
राखून. ठेवला असला तरी व्यावसायिक वास्तुमध्ये
मात्र उत्तरेस असणारा "पृथ्विधर" पाद मालकाला
अथवा मॅनेजरला स्थानापन्न होण्यास श्रेष्ठ मानला
आहे. इतर पर्यायी दिशांमध्ये आग्नेय कोपरा , वायव्य,
नैऋत्य कोपरादेखील ग्राह्य मानला आहे. एक गोष्ट
ध्यानात ठेवावी की बसताना तोंड उत्तरेकडे अथवा
पूर्वेकडे असावे.
दुकान गाळ्यातील नैऋत्य कोपरा हा सर्वाधिक वजनदार
किंवा जडत्त्वाचा असणे आवश्यक आहे. या अनुषंगाने
जड वस्तुंची लोखंडी कपाटे, जड फर्निचर, सामानाच्या
गोण्या, जड लोखंडी अवजारे असल्यास त्यांची योजना
या कोपऱ्यात करावी. हा कोपरा गोदामासाठी उत्तमच.
नौऋत्य कोपऱ्यानंतर दक्षिण व पश्चिम दिशा वजनदार
झाल्याने ऋण ऊर्जांपासून वास्तूचे संरक्षण होईल.
दुकानाचा वायव्यकोपरा
सेल्स प्रमोशनकरीता असणारा माल, त्या नवीन उत्पादनाच्या
जहिरातीची पोस्टर्स वायव्य कोपऱ्यात लावावीत.
जास्त दिवस पडून राहिलेला माल वायव्य कोपऱ्यात
ठेवल्यास त्याचा लवकर विक्री व भावही चंगला मिळतो.
लवकर खराब होणारे ब्रेड, कांदे, बटाटे इ. वस्तूही
वायव्य कोपऱ्यात असल्यास तेज विक्री होते.
आग्नेय कोपरा
अग्नितत्वाच्या या कोपऱ्यात इलेक्ट्रिक स्विचबोर्ड,
तसेच मोठे दुकान असल्यास त्यातील कॉम्प्युटर, फॅक्समशीन,
टी.व्ही. अशी इलेक्ट्रिकल प्रसाधने असावीत. मॉलमधील
चक्की याच कोपऱ्यात असावी.
विक्रीच्या मालामध्ये तेलाचे दबे, जाम, मुरांबे,
लोण्ची, मसाले व घी, मसाल्याचे पदार्थ ही उष्णगुणात्मक
द्रव्ये आग्नेय कोपऱ्यात असावी.
आग्नेय, नैऋत्य, वायव्य या कोपऱ्यानंतर पुर्व-उत्तर-ईशान्य
या तिन दिशा अधिकाधिक हलक्या राहतील अशी योजना करावी.
त्या अनुषंगाने या प्रभागात हलक्या वजनाच्या वस्तू
बिस्किट्स, वेफर्स आदि खाद्यपदार्थ, टुथब्रश, टुथपेस्ट,
साबण, सौदर्यप्रसाधने यांचा डिस्प्ले असावा.
दुकानाच्या भिंतीचे फर्निचर दक्षिण-पश्चिमेस असावे.
हे आपण मागे पाहिलेच. त्याचप्रमाणे या दिशांना जमिनीवरची
कऊन्टर्सही असावीत व त्यावर आकर्षकरित्या विक्री
साहित्याची मांडणी करावी. दुअकानातील सेल्समन या
कऊंटर्वर असल्यास त्याचि दिशा पुर्व तसेच उत्तर
रहील तर गिऱ्हाईकांचे तोंश हे दक्षिण व पश्चिम दिशेस
येईल व गिऱ्हाईकास मालाची व्हरायटी पहवयास मिळेल.
पूर्वेस प्रवेशद्वार असल्यास दुकानाच्या पूर्व
भिंतीत व भितीलगत काऊंटर करता येते. या काऊंटरमध्येच
उत्तरेस ’पृथ्वीधर’ पदात मालकाचे कॅश काऊंटर असावे.
तर पूर्वेच्या जमिनीवरील काऊंटरमध्ये ’रवी’ पादोमध्ये
कॅश काऊंटर असावे.
मयमतमच्या मतानुसार तिजोरीबाबत सोमे धनसज्वयावासम्।
तसेच ’भीधरे कोशगेहंस्यात् असे दिन संदर्भ मिळतात.
माझ्या वैयक्तिक मतानुसार उत्तरेकडील ’पृथ्वीधर’
पदात कॅशड्रॉव्हर येणे श्रेयस्कर. उत्तर हे कुबेराचे
स्थान आहे तसेच ही दिशा शुभ जैविक ऊर्जेची आहे. दुसरे
म्हणजे ’पृथ्वीधर’ लप्प्यात कॅशड्रॉव्हर उत्तरेच्या
दिशेने उघडणे शक्य होतेच त्याचबरोबरमालकासही आपली
दिशा पुर्वेकडे करणारे शक्य होते. एकूणच सिध्दन्त
आणि तांत्रिक बाबींच मेळ बसल्याने शुभ फळे अनुभवास
येतात.
कॅशड्रॉव्हरमध्ये हिरव्या रंगाच्या कपडाच्या
पार्श्वभूमीवर लक्ष्मीची प्रतिमा असलेले चांदिचे
नाणे ठेवून त्याची रोज उदबत्ती ओवाळून पूजा करावी.
कॅशड्रॉव्हरमध्ये श्रीयंत्र तसेच कुबेरयंत्र
ठेवल्यासही उत्तमच.
एका गोष्टीकडे लक्ष द्या की मलकाचे बदण्याचे ठिकान
व कॅश काऊंटर बीमखाली तर येत नाही ना? असे अस्ल्यास
तिजोरीसाठी इतर पर्यायांची जरूर विचार करावा.
गाळ्याच्या ईशान्य अथवा आग्नेय कोपऱ्यात देव्हारा
ठेवावा.
पाण्याच्या माठाचि योजना ईशान्य अथव उत्तरेस असावी.
वरीलप्रमाणे अंतर्भूत सजावट/रचना केल्यास गाळ्याचे
ब्रह्मस्थान आपसुकच सुले राहिल आणि गिऱ्हाईक प्रवेशद्वारापासून
थेट आतमध्ये पश्चिम तसेच दक्षिण दिशेपर्यंत पोहचू
शकतिल.
अधिकाधिक मालच्या अधिकाधिक व्हरायटीमधून मग जास्तीत
जास्त खरेदि करण्याचा मोह आवरने खरच कठीण जाईल. |
|
|
वास्तुमार्गदर्शक
बबनराव पाटील
०९८२१३१८५५२ |
|
|
|
|